सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्यावर आणखी दोन मजले वाढणार आहेत. राज्याच्या पर्यावरण विभागाने नुकतीच याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे बंगल्याच्या विस्तारिकरणाची शाहरुखची ‘मन्नत’ अखेर पूर्ण होणार आहे. बॉलिवूडचा स्टार असलेल्या शाहरुख खानचा वांद्रे येथील बंगला नेहमीच चर्चेत असतो.

हेही वाचा >>> एसटी घोटाळ्याची चौकशी सुरू; तत्कालीन मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून निविदेत फेरफार केल्याचे उघड

Gambling places in Dombivli news in marathi
डोंबिवलीत नेहरू रस्त्यावर पंजाबी भाईचा जुगार अड्डा
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Chhaava
‘छावा’ चित्रपटाच्या तिकिटांची अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू; ४८ तासांत ‘इतक्या’ लाख तिकिटांची विक्री
central government is going to develop 50 new tourism areas in country
पर्यटनाची आवड आहे… केंद्र सरकार ५० नवीन पर्यटन क्षेत्रांचा विकास करणार, बिनव्याजी कर्जाचीही तरतूद
Reliance launched the Teerth Yatri Seva initiative at Maha Kumbh
महाकुंभात भाविकांसाठी रिलायन्सची ‘तीर्थयात्री सेवा’
msrdc proposal approved for construction of new city near vadhavan port
वाढवण बंदरालगत आणखी एक ‘मुंबई’? काय आहे प्रकल्प?
new building construction hearing thane Municipal Corporation tree cutting Raymond company
रेमंड येथील वृक्षतोडी संदर्भात महापालिकेत सुनावणी
Metro Line 8 to Link Mumbai and Navi Mumbai Airports
मुंबई विमानतळ ते थेट नवी मुंबई विमानतळ…कशी असेल मेट्रो – ८? खासगी- सार्वजनिक उभारणीचे कोणते फायदे?

माउंट मेरी कडे जाणाऱ्या रस्त्यावरचा हा बंगला शाहरुखच्या चाहत्यासाठीही आकर्षणाचा विषय आहे. सध्या सहा मजल्यांचा असलेला हा बंगला आता लवकरच आणखी उंच होणार आहे. या बंगल्याच्या वर आणखी दोन मजले वाढण्यासाठी महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (एमसीझेडएमए) नुकतीच परवानगी दिली आहे. शाहरुखची पत्नी गौरी खान हिने या परवानगीकरिता संबंधित विभागाकडे अर्ज केला होता.

हेही वाचा >>> सांडपाणी पुनःप्रक्रिया प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य; समुद्रात जाणाऱ्या सांडपाण्याचा पुनर्वापर शक्य

वांद्रे पश्चिम येथील पालिकेच्या एच पश्चिम विभागाच्या अखत्यारीत येणारा मन्नत या बंगल्याचे आता आणखी विस्तारिकरण करून त्यात काही बदल करण्यात येणार आहेत. या सहा मजली बंगल्याला २००२ मध्ये आयओडी तसेच २००६ मध्यवं भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले आहे. त्यानंतर बंगल्यामध्ये तळघरात दोन मजले आणि जलतरण तलाव बांधण्यात आला व त्यालाही भोगवटा प्रमाणपत्र व सीआरझेड परवानगी मिळालेली आहे.

Story img Loader