राज ठाकरेंच्या नावे खंडणी मागणाऱ्या टोळीला अटक; चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व चालकाचा समावेश

या प्रकरणात पोलिसांनी एका मराठी अभिनेत्रीलाही नोटीस बजावल्याचं सांगितलं जात आहे.

Raj Thackeray

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने खंडणी मागणाऱ्या टोळीला मुंबईतल्या मालवणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्यांच्या मध्ये मराठी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि त्यांच्या चालकाचा समावेश आहे. दिग्दर्शक मिलन वर्मा, निर्माते युवराज बोऱ्हाडे आणि चालक सागर सोलनकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

या प्रकरणात पोलिसांनी एका मराठी अभिनेत्रीलाही नोटीस बजावल्याचं सांगितलं जात आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपींनी मड परिसरातल्या एका बंगल्याच्या सुरक्षारक्षकाला मारहाण केली होती आणि या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल केला. सुरक्षारक्षकाने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तिघांना अटक केली.

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला सुरक्षारक्षकाला मारहाण करताना दिसत आहे. मारत असताना ती त्याला राजसाहेबांना ओळखत नाही का? मुंबईत राहून मराठी बोलता येत नाही का? काम कोणासाठी करत आहेस? असे प्रश्नही विचारताना दिसत आहे. व्हिडिओत आलेल्या उल्लेखावरुन या महिलेचं नाव दिपाली असल्याचं दिसून येत आहे.

या प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनुराग दिक्षीत यांनी माहिती दिली आहे. सुरक्षारक्षकाच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून यातल्या महिलेला पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं होतं. मात्र ती रात्री आली नाही, म्हणून तिला आता पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Extortion using name of raj thackeray marathi film director producer caught by police vsk

ताज्या बातम्या