मुंबई : गुन्हे शाखेने बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्रे तयार करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे देबज्योती बसू आणि अनुप वर्म आहेत. आरोपीना न्यायालयाने ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार जानेवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत घडला आहे.

आरोपींनी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेच्या शिक्क्यांची आणि स्वाक्षऱ्याद्वारे बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्र तयार केली आणि ती नौदलाच्या कुलाबा येथील कार्यालयात कंत्राटादारामार्फत नोकरी मिळवण्यासाठी सादर केली होती. या प्रकरणात गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अविनाश गावडे तक्रारदार आहेत. तक्रारीनुसार, बनावट कागदपत्रे नरिमन पॉईंट येथील एका कंपनीच्या कार्यालयात तयार करण्यात आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठवण्यात आली आणि ती खोटी असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे हा प्रकार उघड झाला. त्यानंतर कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि पुढील तपासासाठी प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(१), ३३५, ३३६(२), ३३७, ३३९ आणि ३४०(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.