मुंबईत एका ३० वर्षीय सुप्रसिद्ध युट्यूबरला घर फोडीच्या गुन्ह्यात गुरुवारी अटक करण्यात आली आहे. विनोबा भावे नगर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आरोपीच्या ताब्यातून १४ मोबाईल फोन, धारदार शस्त्रे, बनावट दागिने तसेच विदेशी चलन जप्त करण्यात आले. अभिमन्यू गुप्ता यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३८० (घरात चोरी) यासह संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यूट्यूब व्यतिरिक्त, आरोपी अभिमन्यू गुप्ता याचे टिकटॉकवर मोठ्या संख्येने फॉलोअर्स होते. त्यावर भारतात त्यावर बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, गुप्ता आपली आलिशान जीवनशैली टिकवण्यासाठी मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील घरांमध्ये चोरी करत असे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ता आपली ओळख लपवण्यासाठी टोपी आणि मास्क घालून फिरत असे.

cat
दुबईमध्ये पुराच्या पाण्यात बुडणाऱ्या मांजरीची जीव वाचवण्यासाठी धडपड! कारच्या दरवाजाला लटकणाऱ्या मांजरीचा थरारक Video Viral
Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका

कुर्ला येथील एका बंद घरात झालेल्या चोरीप्रकरणी अभिमन्यू गुप्ता याला अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये तो सोन्या-चांदीचे दागिने चोरून फरार झाला. घरात राहणाऱ्या कुटुंबाला घरी आल्यानंतर दागिने गायब झाल्याचे लक्षात आल्याने हा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक पद्माकर पाटील यांनी सांगितले की, कुर्ल्यातील कुटुंबाच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आणि १५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले.

 “सुरुवातीला तपास पथक आरोपी गुप्ताची ओळख पटवण्यात अपयशी ठरले, कारण त्याने टोपी आणि फेस मास्क घातलेला होता. पण एका फुटेजमध्ये त्याने आपली टोपी आणि फेस मास्क काढला होता आणि त्याची ओळख टिकटॉकर गुप्ता अशी झाली होती. यानंतर विनोबा भावे नगर पोलिसांनी सापळा रचून परिसरात घरफोडीचा प्रयत्न करताना त्याला पकडले, असे पोलीस उपनिरीक्षक पद्माकर पाटील यांनी म्हटले.

पोलिसांच्या चौकशीत आरोपी अभिमन्यू गुप्ता याने मुंबई परिसरात १५ हून अधिक घरांवर दरोडा टाकल्याची कबुली दिली असून त्यापैकी चार कुर्ल्यातील आहेत. गुप्ता घराबाहेर ठेवलेले बूट आणि चप्पल चोरायचा, असेही पोलिसांनी उघड केले. झडतीदरम्यान पोलिसांना त्याच्या घरातून चपलांनी भरलेली चार पोती सापडली. पाटील म्हणाले की, अभिमन्यू गुप्ता याने देखील कबूल केले की चोरीच्या मौल्यवान वस्तू विकून मिळालेले पैसे त्यांच्याकडून महागडे कपडे खरेदी करण्यासाठी आणि खर्च करण्यासाठी वापरले गेले.