विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळ महानगरी एक्स्प्रेसमध्ये मंगळवारी दुपारी ४ नंतर तांत्रिक बिघाड झाला. यामुळे डाऊन जलद लोकल वेळापत्रकावर काहीसा परिणाम झाला. या मार्गावरील लोकल विलंबाने धावत आहेत.

हेही वाचा – VIDEO: मेट्रोत बसून एकमेकांना टाळ्या देत हसत का होता? नरेंद्र मोदींबरोबरच्या चर्चेवर एकनाथ शिंदे म्हणाले…

हेही वाचा – “मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट दिलं होतं”, फडणवीसांच्या आरोपांवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, “माझ्यापुढं…”

मंगळवारी सकाळी ६,३० च्या सुमारास कसारा स्थानकात पोहोचलेल्या विदर्भ सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या लोकोमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. दुसरा लोको जोडण्यासाठी मध्य रेल्वेला सकाळचे १०.१५ वाजले. त्यानंतर ही गाडी सीएसएमटीकडे रवाना झाली. त्यामुळे सीएसएमटी दिशेने येणाऱ्या जलद लोकल १० मिनिटे विलंबाने धावू लागल्या. जलद लोकल वेळापत्रक सुरळीत होत असतानाच दुपारी ४.०८ च्या सुमारास सीएसएमटी यार्डमधून मुलुंड यार्डच्या दिशेने निघालेल्या महानगरी एक्स्प्रेसमध्ये विद्याविहार स्थानकाजवळ बिघाड झाला. ही गाडी लोकल मार्गिकेवरून पाचव्या मार्गिकेवर जात असतानाच झालेल्या बिघाडामुळे कल्याण दिशेने जाणाऱ्या जलद लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले. दहा मिनिटात दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आणि गाडी पुढे रवाना करण्यात आली. मात्र, यामुळे जलद लोकल १० मिनिटे उशिराने धावत आहेत.