पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल – बोरिवलीदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेतले असून मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) बोरिवली ते विरार दरम्यानच्या पाचव्या – सहाव्या मार्गिकेचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण केले आहे. या मार्गिकेचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. येत्या पाच वर्षांत पाचवी – सहावी मार्गिका सेवेत आणण्याचे उद्दिष्ट आहे. तसे झाल्यास मेल, एक्स्प्रेसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होईल. परिणामी, भविष्यात चर्चगेट – विरारदरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढतील आणि जलद लोकल प्रवास अधिक सुकर होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बोरिवली ते विरार पाचव्या – सहाव्या मार्गिकेचे काम एमआरव्हीसीकडून करण्यात येणार आहे. एमआरव्हीसीतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी दोन हजार १८४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाले असून भूसंपादनाचा प्रस्ताव मुंबई, ठाणे, पालघर जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fast local train between churchgate virar will soon be easier mumbai print news msr
First published on: 01-07-2022 at 13:03 IST