scorecardresearch

Premium

मुलुंडमध्ये मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा नाकरणाऱ्या पिता – पुत्राला अटक

या महिलेने गुरुवारी मध्यरात्री मुलुंड पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पिता-पुत्राविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

father and son arrested for denying office space to marathi woman in mulund
मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा नाकरणाऱ्या पिता – पुत्र

मुंबई : मुलुंड परिसरात कार्यालयासाठी जागा शोधण्यासाठी गेलेल्या एका मराठी महिलेला परप्रांतीय व्यक्तीने जागा देण्यास नकार दिल्याचा प्रकार बुधवारी घडला. या प्रकारामुळे मुलुंड परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. या महिलेने गुरुवारी मध्यरात्री मुलुंड पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पिता-पुत्राविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

हेही वाचा >>> “घर नाकारणाऱ्या सचिवाला…”; शर्मिला ठाकरेंची भेट घेतल्यानंतर तृप्ती देवरूखकरांची पहिली प्रतिक्रिया

Two accused who raped minor girl
चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्यांना कारागृहातून घेतले ताब्यात; दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी
Santacruz murder case
सांताक्रुझ हत्येप्रकरणी आरोपीला अटक, गुन्हे शाखेची कारवाई
doctor arrest for raping college girl
पुणे : महाविद्यालयीन युवतीवर मद्य पाजून बलात्कार; डॉक्टरविरुद्ध गुन्हा
kdmc commissioner order to fill potholes in dombivli kalyan
रात्रंदिवस काम करुन डोंबिवली-कल्याणमधील खड्डे तीन दिवसात भरा; आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांचे आदेश

मुलुंड पश्चिम येथील शिवसदन इमारतीमध्ये बुधवारी सकाळी ही घटना घडली. पीडित महिला तृप्ती देवरूखकर पतीसोबत या सोसायटीमध्ये कार्यालयाकरीता जागा शोधण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी सोसायटीचे सचिव प्रवीण ठक्कर आणि त्यांचा मुलगा निलेश ठक्कर यांनी आम्ही मराठी माणसांना जागा देत नाही असे सांगितले. यावेळी महिलेने या संपूर्ण घटनेचे मोबाइलमध्ये चित्रण केले. मात्र या पिता-पुत्राने महिलेसोबत झटापट करून त्यांचा मोबाइल काढून घेण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण महिलेने समाजमाध्यमांव टाकल्यानंतर तत्काळ त्याची दखल मनसेच्या कार्यकर्त्यानी घेतली. त्यांनी संबंधित वृद्ध व्यक्तीला गाठून याबाबत जाब विचारला. अखेर या दोघांनी महिलेची माफी मागितली. दरम्यान, तृप्ती देवरूखकर यांनी गुरुवारी रात्री याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून रात्रीच पिता-पुत्राला ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर या दोघांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Father and son arrested for denying office space to marathi woman in mulund mumbai print news zws

First published on: 29-09-2023 at 14:26 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×