scorecardresearch

Premium

मुंबईः अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याला अटक

पीडित मुलगी १० वर्षांची असल्यापासून आरोपी घरात कोणीच नसताना मुलीवर लैंगिक अत्याचार करीत होता.

father arrested for sexually abusing minor girl in borivali
अल्पवयीन मुलीवर अत्याचार

बोरीवली पश्चिम येथे १३ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याला एमएचबी पोलिसांनी अटक केली. गेल्या अनेक वर्षांपासून आरोपी पीडित मुलीवर अत्याचार करीत होता. याप्रकरणी बलात्कार, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी १० वर्षांची असल्यापासून आरोपी घरात कोणीच नसताना मुलीवर लैंगिक अत्याचार करीत होता.

हेही वाचा >>> मुंबईतील मॉडेलवर रांचीत बलात्कार, मग धर्मांतरासाठी दबाव; ‘द केरला स्टोरी’ पाहून पीडितेची थेट पोलीस ठाण्यात धाव

gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…

वारंवार झालेल्या प्रकारानंतर पीडित मुलीने आईला हा प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला. पण आरोपी पित्याने पत्नीला खोटी माहिती दिली. त्यानंतर आरोपीने मुलीला मारण्याची धमकी दिली आणि तो तिच्यावर अत्याचार करीतच होता. या त्रासाला कंटाळून अखेर १३ वर्षांच्या मुलीने नुकतीच एमएचबी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी पित्याला राहत्या घरातून अटक केली. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-06-2023 at 11:45 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×