मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असा लौकिक असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी ८९ हजार ३५३ कोटींवर गेल्या आहेत. ही रक्कम विविध बँकांमध्ये मुदत ठेवी स्वरूपात ठेवण्यात आली आहे. पालिकेच्या विविध विभागांच्या अधिशेष रकमेच्या मुदतठेवी विविध बँकांमध्ये आहेत. या मुदतठेवींचा लेखाजोखा मुंबई महानगरपालिकेच्या वित्त विभागाने प्रशासकांना सादर केला आहे.

वित्त विभागाने विविध बँकांचे व्याजदर मागवून सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या बँकांमध्ये या ठेवी गुंतवल्या आहेत. महानगरपालिकेच्या या मुदत ठेवीमधूनच आस्थापना खर्च व निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यात येतात. तसेच विविध विकासकामांसाठी कंत्रादारांकडून घेतलेल्या अनामत रकमांचा या ठेवीमध्ये समावेश असतो.

BMC, 103 aapla dawakhana sunstroke, cold room for Sunstroke, Sets Up 2 Bed Reserves sunstroke, 14 hospitals sunstroke, bmc prepares for sunstroke, mumbai municioal corporation, mumbai news, sunstroke news, balasaheb thackeray aapla dawakhana, marathi news,
उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज, १०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
india demand of land marathi news
कार्यालयीन जागांच्या मागणीत ४३ टक्के वाढ, पहिल्या तिमाहीत १.६२ कोटी चौरस फुटांचे व्यवहार; बंगळूरुचा सर्वाधिक वाटा
Best Coworking Spaces in Pune
कार्यालयीन जागा सहकार्यात पुणे देशात आघाडीवर

हेही वाचा: ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना दाऊदचे दोन हस्तक मारणार’; मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पनाईनवर धमकीचा मेसेज

महानगरपालिकेचे महसुली उत्पन्न घटल्यामुळे मुदत ठेवींमधील प्रकल्पांसाठी राखीव असलेल्या निधीतून गेल्यावर्षी पाच हजार कोटींची रक्कम काढण्यात आली होती. तर यावर्षीही राखीव निधीतून प्रकल्पांसाठी खर्च करण्यात आला. विविध प्रकल्पांसाठी हा निधी संलग्न करण्यात आला आहे. दरवर्षी या मुदतठेवींमधील कोट्यावधींच्या ठेवी परिणत (मॅच्युअर) होत असतात. तर दरवर्षी नव्याने मुदतठेवी ठेवल्या जातात.