Mumbai Crime : मुंबईत एका महिला डॉक्टरला मारहाण करण्यात आल्याची घटना लोकमान्य टिळक रुग्णालयात म्हणजेच सायन रुग्णालय या नावाने परिचित असलेल्या ठिकाणी घडली आहे. मुंबईतलं हे रुग्णालयात मुंबई महापालिकेतर्फे चालवण्यात येतं. मद्यधुंद अवस्थेत राडा करत एका रुग्णाने महिला डॉक्टरला मारहाण ( Mumbai Crime ) केल्याची घटना घडली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली अशी माहिती मार्डच्या डॉक्टरांनी दिल.
नेमकं काय घडलं? पोलिसांनी काय सांगितलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका रुग्णाने मद्यधुंद अवस्थेत राडा घातला आणि एका महिला डॉक्टरला मारहाण ( Mumbai Crime ) केली. एक माणूस जखमी अवस्थेत लोकमान्य टिळक रुग्णालयात आला. त्याला गंभीर इजा झाली होती आणि त्याच्या जखमेला टाके घालावे लागणार होते. इतर डॉक्टरांनी त्याला आधीच टाके घातले होते आणि त्याच्या जखमेत अडकलेला कापूस डॉक्टर काढत होत्या, हे करावं लागतं कारण काय झालं आहे ते पाहण्यासाठी जखम मोकळी करावी लागते. त्यावेळी या रुग्णाला वेदना होऊ लागल्या ज्यानंतर त्याने ( Mumbai Crime ) डॉक्टरला ढकललं. या रुग्णाने मद्यपान केलं होतं अशी माहितीही समोर आली आहे. आम्ही याबाबत अधिक माहिती घेत आहोत असं पोलिसांनी स्पष्ट केलं. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला आहे. राज्य आरोग्य सेवा हिंसाचार प्रतिबंध कायद्याच्या अंतर्गत हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मार्डच्या डॉक्टरची पोस्ट
मार्डचे सदस्य असलेले डॉक्टर अक्षय मोरे यांनी यासंदर्भातली एक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की सायन रुग्णालयात हिंसाचाराची घटना घडली. पहाटे काही लोकांचा जमाव आला. त्यानंतर त्यातल्या काही जणांनी महिला डॉक्टरला मारहाण ( Mumbai Crime ) केली. त्यात ही महिला डॉक्टर जखमी झाली आहे. मद्यधुंद अवस्थेतल्या रुग्णाने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी महिला डॉक्टरच्या दिशेने रक्ताने माखलेले कापसाचे बोळेही फेकले. तसंच तिला नखांनी ओरखडलं त्याचप्रमाणे मारहाण कल असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे असंही या डॉक्टरने म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
रुग्ण मद्यपान करुनच रुग्णालयात आला होता
“रुग्ण हा त्याच्या सात ते आठ साथीदारांसह आला होता. त्याने मद्यपान केलं होतं. तो कुणालातरी मारहाण करुन आला होता. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर जखमा होत्या. पहाटे साडेतीनच्या दरम्यान महिला डॉक्टर तपास होती. त्यासाठी आधीपासून जखमेची पट्टी काढावी लागणार होती. ही नॉर्मल प्रोसिजर आहे. नेमकं काय घडलं आहे हे पाहण्यासाठी जखमेची पट्टी काढावी लागते. यानंतर या रुग्णाने तिला शिव्या देण्यास सुरुवात केली. रुग्ण ओरडू लागल्याने इतर नातेवाईकांनी तिला शिव्या द्यायया सुरुवात केली. तिच्या दिशेने रक्ताने माखलेले बोळे फेकले. त्यावेळी महिला डॉक्टरांनी सुरक्षा रक्षकाला बोलवलं म्हणून तिला गंभीर स्वरुपातली मारहाण झाली नाही.” असं अक्षय मोरे यांनी सांगितलं आहे.
मागच्या आठवड्यात एका मार्डच्या डॉक्टरचा काही रुग्णांनी पहाटे दोन वाजता पाठलाग केला. आमचा हा सहकारी त्याचं काम संपवून हॉस्टेलवर येत होता जे रुग्णालयाच्या परिसरापासून थोडं लांब आहे. तिथे त्याचा काही लोक पाठलाग करत होते ही घटनाही या डॉक्टरने सांगितली आहे.