मुंबई : नायर रुग्णालयात एका वैद्याकीय महिला डॉक्टरचा सहयोगी प्राध्यापकाने विनयभंग केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी महिलांवरील लैंगिक अत्याचारविरोधी असलेल्या मुख्य अंतर्गत तक्रार समितीकडे विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर केलेल्या तपासणीत तथ्य आढळून आले आहे. त्यामुळे लैंगिक अत्याचारविरोधी समितीने सहयोगी प्राध्यापकासह अन्य एका डॉक्टरवर आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस केली आहे.

नायर रुग्णालयात वैद्याकीय अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षांमध्ये ती शिक्षण घेत आहे. लैंगिक अत्याचारविरोधी समितीकडे करण्यात आलेल्या तक्रारीनुसार पीडित विद्यार्थिनी मार्चमध्ये औषधनिर्माण शास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापकाला भेटण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्यांनी तिला आपल्या खोलीमध्ये बोलावून तिच्या खेळाबाबत प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी शनिवारी दुपारी पुन्हा तिला आपल्या केबिनमध्ये बोलवले. यावेळी संबंधित प्राध्यापकाने तपासणीचे निमित्त करून विनयभंग केल्याचे पीडित विद्यार्थिनीने तक्रारीमध्ये म्हटले आहे.

Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Mahendra Thorve bodyguard beaten man
Mahendra Thorve : “शिंदेंच्या आमदाराच्या सुरक्षा रक्षकाची भर रस्त्यात एकाला रॉडने मारहाण, चिमुकल्यांचा टाहो”, ठाकरे गटाकडून VIDEO व्हायरल
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?

रस्तेविकासावरून रस्सीखेच; शिरूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे काम ‘एमएसआरडीसी’ऐवजी ‘एमएसआयडीसी’कडे

प्राध्यापकाच्या या अश्लील कृत्याची माहिती तिने आपल्या मित्रांना दिली. तसेच याची तक्रार मुख्य अंतर्गत तक्रार समितीकडे केली. या समितीने केलेल्या तपासणीनंतर विद्यार्थिनीच्या म्हणण्यात तथ्य आढळून आल्याने संबंधित प्राध्यापकावर कारवाई करत त्यांची बदली करण्याची शिफारस करण्यात आली. तर या प्रकरणात साक्ष देणारे डॉ. सचिन सातपुते यांचे समुपदेशन करण्याबरोबरच त्यांना ताकीद देण्याची आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना ताकीद देण्याची शिफारस समितीने केली.

समितीकडून शिफारशी

● संबंधित प्राध्यापकाची अन्य महाविद्यालयात बदली करण्यात यावी

● हा प्राध्यापक तक्रारदाराच्या कोणत्याही परीक्षेत परीक्षक नसावा

● प्रतिवादीची वेतनवृद्धी एक वर्षासाठी रोखण्यात यावी

● प्रतिवादीला लिखित स्वरूपात समज देण्यात यावी

● डॉ. सचिन सातपुते यांचे समुपदेशन करून त्यांना लिखित ताकीद देण्यात यावी

● अधिष्ठाता यांना ताकीद देण्यात यावी.

संबंधित प्राध्यापकाची शैक्षणिक कामातून प्रशासकीय कामात बदली करण्यात आली. तसेच चौकशीनंतर समितीने केलेल्या शिफारशीनुसार संबंधित प्राध्यापकाची शिफारस वैद्याकीय शिक्षण संचालकांकडे पाठवली आहे.

डॉ. सुधीर मेढेकरअधिष्ठाता, नायर रुग्णालय