scorecardresearch

मुंबईमध्ये पाचव्या ‘माणदेशी महोत्सवास’ सुरुवात

महोत्सवात प्रसिद्ध भारुडकार चंदाताई तिवाडी आपली कला सादर करणार आहेत. माणदेशी चॅम्पीयन महिला कुस्ती त्याचबरोबर माणदेशी लोकनृत्याचा आविष्कार ‘गझी नृत्य’ पाहण्यास देखील मिळणार आहे.

मुंबईमध्ये पाचव्या ‘माणदेशी महोत्सवास’ सुरुवात
मुंबईमध्ये पाचव्या ‘माणदेशी महोत्सवास’ सुरुवात

मुंबई येथे आज पासून साताऱ्यातील पाचवा माणदेशी महोत्सवास सुरवात झाली.माणदेशी भगिनींना प्रोत्साहीत करण्य़ासाठी महोत्सवास आवर्जून भेट द्या, असे आवाहन माणदेशी फ़ाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी मुंबईकरांना केले आहे.दि ५ ते ८ जानेवारी दरम्यान मुंबई प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात हा महोत्सव भरला आहे.या महोत्सवाचे आज उद्घाटन झाले.

हेही वाचा- नवी मुंबईत वर्षभरात प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाईत ३१ लाखाहून अधिक दंडवसूली; ३ लाख किलोहून अधिक प्लास्टिक जप्त

दोन वर्षांच्या कालावधीनंतर हा महोत्सव मुंबई येथे होत आहे. यावेळी महोत्सवात प्रसिद्ध भारुडकार चंदाताई तिवाडी आपली कला सादर करणार आहेत. माणदेशी चॅम्पीयन महिला कुस्ती त्याचबरोबर माणदेशी लोकनृत्याचा आविष्कार ‘गझी नृत्य’ पाहण्यास देखील मिळणार आहे. त्याचप्रमाणे १० लाख महिलांचा परिवार असलेल्या माणदेशातील शेतकरी, उद्योजिका आणि ऍथलिट्स भगिनी आपल्या संघर्षगाथा माणदेशीच्या व्यासपीठावरुन उलगडणार आहेत.

हेही वाचा- सिडकोचे कोटींचे भूखंड बेकायदा रोपवाटिका चालकांना आंदण, पालिका व सिडकोचे दुर्लक्ष

या महोत्सवात स्वतःहा कुभांरकाम करण्याचा आनंद घेऊ शकता, स्वत: लाटणं तयार करुन घ्या, लाखेच्या बांगड्या बनवून घ्या, टोपली किंवा झाडू वळवून घ्या, ही सारी काही गावातली संस्कृती येथे अनुभवता येणार आहे.खवय्यां साठी साताऱ्याचा खर्डा, शेंगदाण्याच्या चटणीसह वेगवेगळ्या चटण्या, लोणची, ज्वारीची भाकरी, कुरड्या, मासवड्या, साताऱ्याचे जगप्रसिद्ध कंदी पेढे , प्रसिद्ध जेन घोंगडीही उपलब्ध आहे, यासाठी शेतकरी भगिनी मोठ्या संख्येने मुंबईत जमल्या आहेत. ८ जानेवारी पर्यंत सकाळी १०.३० ते रात्री ८.३० या वेळेत हा महोत्सव सर्वासाठी मोफत खुला आहे. दुष्काळी भागातील भगिनींना प्रोत्साहीत करण्य़ासाठी याठिकाणी आवर्जून भेट द्या, असे आवाहन माणदेशी फ़ाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी मुंबईकरांना केले आहे.

हेही वाचा- महालक्ष्मी रेसकोर्सवर संकल्पना उद्यान साकारण्याच्या हालचालींना वेग

साताऱ्यातील माण एक दुष्काळग्रस्त भाग, दुष्काळामुळे शेती नाही, हाताला काम नाही. परिस्थितिशी दोन हात करण्यासाठी माणदेशी फ़ाऊंडेशनच्या चेतना सिन्हा यांनी परिसरातील १० लाख महिलांना एकत्र करत स्वयंरोजगार सुरु केला. तेथील संस्कृती,खाद्य पदार्थ आदींचे बचत गट करून भगिनीना उद्योग-व्यवसायात उभे केले.उत्पादनाची बाजारपेठ शहरात मिळवण्यासाठी ‘माणदेशी महोत्सवा’ चा जन्म झाला.७ हजार महिलांनी माणदेशी महिला सहकारी बॅंकेच्या माध्यमातून छोटी कर्जे घेत स्वयंरोजगारासाठीची यंत्रे विकत घेतली आहेत.महिलांना प्रशिक्षण दिले आहे. त्यातून अनेक वस्तू मुंबईकरांना उपलब्ध होणार आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-01-2023 at 20:05 IST

संबंधित बातम्या