नारायण राणे यांचा पवित्रा

मुंबई : ‘मी कोणालाही घाबरत नाही. सर्वाना पुरून उरलो आहे. माझ्या घरावर चालून आलात, पण तुम्हालाही घरे व मुले आहेत हे लक्षात ठेवा, असा आव्हानात्मक इशारा शिवसेनेला देतानाच केंद्रीय सूक्ष्म लघू-उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मी आता जपून शब्द वापरणार आणि शिवसेनेच्या विरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचे जाहीर के ले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात के लेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राणे यांना मंगळवारी अटक करण्यात आली होती. रात्री उशिरा जामिनावर मुक्तता झाल्यावर मुंबईत परतलेल्या राणे यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ठाकरे यांना लक्ष्य के ले. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे १७ सप्टेंबपर्यंत फार काही बोलणार नाही. सध्या शब्द जपून वापरणार असल्याचे सांगत ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका के ली.  शिवसेना वाढविण्यात माझा मोठा वाटा आहे. तेव्हा आताचे अपशब्द वापरणारे कुठेही नव्हते. माझ्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पण भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाबाबत

के लेल्या वक्तव्यानंतर  मुख्यमंत्री ठाकरे यांनी बीडीडी चाळींच्या भूमिपूजन कार्यक्रमात भाजप नेत्यांविरोधात ‘ थोबाड फोडा,’ असे आदेश शिवसैनिकांना दिले होते. योगी आदित्यनाथ यांच्याबाबत चपलांनी मारले पाहिजे व गृहमंत्री अमित शहांसंदर्भात ‘निर्लज्जपणे’ असे शब्द वापरले होते. मग मुख्यमंत्री स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव विसरल्याने मी प्रतिक्रिया व्यक्त केल्याने काय चुकले? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एवढे चांगले बोलणाऱ्याला मुख्यमंत्री के ले, असा टोला लगावला. माझ्याविरोधात चिपळूणमध्ये निदर्शने करताना १७ शिवसैनिक होते, तिथून पुढे १३ कार्यकर्ते होते. पण शिवसैनिकांची प्रचंड गर्दी झाली होती, असे सांगितले जात असल्याची राणे यांनी खिल्ली उडविली.

परिवहनमंत्री अनिल परब यांनी पोलिसांना अटकेचे आदेश दिले. आता परब यांच्यासह  संशयास्पद मृत्यू झालेल्या दिशा सालीयन, पूजा चव्हाण या प्रकरणांमध्ये दोषींवर कारवाईसाठी न्यायालयात पाठपुरावा केला जाईल. तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असे राणे यांनी स्पष्ट केले.

शुक्रवारपासून जनआशीर्वाद यात्रा

जनआशीर्वाद यात्रा शुक्र वारपासून सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात सुरू होईल, असेही राणे यांनी स्पष्ट के ले. या पत्रकार परिषदेच्या वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशीष शेलार, प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर हे उपस्थित होते. भाजप नेतृत्वाने या काळात दिलेल्या पाठिंब्याबद्दल राणे यांनी आभार मानले.