घोडपदेवमधील घटना; दोन जखमी, तीन अटकेत, आठ फरारी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इमारतीत गाडय़ा उभ्या करण्यावरून होणारे वाद हे नेहमीचेच. पण, या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाल्याची घटना घोडपदेव येथे मंगळवारी रात्री घडली. चाकू, काचेच्या बाटल्या आणि बांबूंनी झालेल्या या हाणामारीत दोन जण जखमी झाले असून भायखळा पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. अजूनही आठ आरोपी फरारी असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न झाल्याने काही काळ घोडपदेव आणि भायखळा पोलीस ठाणे परिसरात मोठय़ा प्रमाणावर जमाव जमा झाला होता, परंतु, पोलीस उपायुक्तांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

प्रतिनिधी, मुंबईप्रतिनिधी, मुंबईमंगळवारी सायंकाळी झुझर राजकोटवाला (५०), सिराज आरसेवाला प्रतिनिधी, मुंबई (४०), अब्दुल गोगावाला (३४) यांचा रिझवान उस्मान लकडावाला (३५), सरफराज उस्मान लकडावाला (३६) आणि मोहम्मद उस्मान लकडावाला (२६) यांच्याशी गाडय़ा उभ्या करण्यावरून पुन्हा वाद झाला. लकडावाला यांनी आरसेवाला, गोगावाला, राजकोटवाला यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हाणामारीत चाकू, बांबू, काचेच्या बाटल्यांचाही वापर झाला. अखेर, पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला कळवून भायखळा पोलिसांना घटनास्थळी पाचारण करावे लागले. पोलिसांनी सरफराज, रिझवान, मोहम्मद यांना अटक केली. हाणामारीत जखमी झालेले आरसेवाला यांच्या हातावर चाकूने वार झाला असून गोगावाला यांच्या पायांना काचा लागल्या आहेत. हाणामारी करणाऱ्या सर्व व्यक्ती याच इमारतीत राहणाऱ्या असून आठ आरोपी अजूनही फरारी असल्याचे भायखळा पोलिसांनी स्पष्ट केले. हाणामारीत जखमी झालेले एक रहिवासी बोहरा समाजातील धर्मगुरूच्या जवळचे नातलग असल्याने या सर्व घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होत होता. घोडपदेव आणि भायखळा पोलीस ठाण्याच्या परिसरात रात्री ११च्या सुमारास मोठय़ा प्रमाणावर जमाव एकत्र होण्यास सुरुवातही झाली होती. अखेर, परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त प्रवीणकुमार पडवळ आणि परिमंडळ पाचचे उपायुक्त परमजीत दहिया यांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेत परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fighting for car parking in mumbai
First published on: 23-06-2016 at 02:53 IST