‘त्या’ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा – भांडारी

भुसावळ औष्णिक वीज प्रकल्पातील अपघाताला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

 भुसावळ औष्णिक वीज प्रकल्पातील अपघाताला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी केली आहे. उर्जामंत्री, महानिर्मिती अध्यक्ष, कार्यकारी संचालक, प्रकल्प संचालक हे अपघाताला जबाबदार असून त्यांच्याविरूध्द कारवाई व्हावी, असे त्यांनी स्पष्ट केले. या केंद्रात शुक्रवारी झालेल्या अपघातात निरपराध कर्मचाऱ्यांचा बळी गेला. अपघाताआधी काही क्षण महानिर्मिती कंपनीचे कार्यकारी संचालक आशिष शर्मा त्या कामाची पाहणी करून गेले होते. त्यामुळे सुदैवाने ते अपघातात सापडले नाहीत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: File case against that officers madhav bhandari

ताज्या बातम्या