शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करा ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश

खोटे दस्तावेज तयार करुन शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विमा कंपन्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हे नोंद करण्याचे आदेशही पवार यांनी दिले.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई: खोटे दस्तावेज तयार करुन सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपन्यांवर तात्काळ गुन्हे नोंद करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिले. राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असून केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सोयाबीनसह कापसाच्या प्रश्नांसंबधी राज्याचे शिष्टमंडळ लवकरच पंतप्रधानांना भेटणार असल्याची माहितीही पवार यांनी दिली.

 सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या विविध प्रश्नांसंबधी बैठकीनंतर पवार बोलत होते.यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र िशगणे, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष  राजू शेट्टी,  रविकांत तुपकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.  राज्यातील अतिवृष्टी बाधितांना राज्य सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या मदतीचे वाटप  सुरु आहे, त्याला गती देण्यात येईल. शेतकऱ्यांना दिलेले अनुदान तसेच आर्थिक मदत कोणत्याही परिस्थितीत बँकांनी रोखू नये. सदरची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात येऊ नये, याबाबतच्या सूचना संबंधित बँकांना देण्यात येतील. खोटे दस्तावेज तयार करुन शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विमा कंपन्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हे नोंद करण्याचे आदेशही पवार यांनी दिले. नदीकाठच्या खरडून गेलेल्या जमिनी तयार करण्यासाठी रोजगार हमी योजनेसह ‘सीएसआर’ फंडातून मदत करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: File charges against insurance companies for frauding farmers says ajit pawar

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या