मुंबई : कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लान (सीझेडएमपी) च्या अंतिम अधिसूचनेच्या प्रक्रियेला अधिक गती देण्यात येऊन येत्या १५ दिवसांत त्याबाबत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी शनिवारी देवेंद्र फडणवीस यांना दिले. विविध कार्यक्रमांसाठी मुंबईच्या दौऱ्यावर असताना महाराष्ट्राशी संबंधित काही विषयांबाबत स्वतंत्र वेळ देण्याची मागणी  फडणवीस यांनी त्यांच्याकडे केली होती. त्यानुसार, ही बैठक झाली. सीझेडएमपीचा आराखडा हा राज्यात फडणवीस यांचे सरकार असताना तयार करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करीत तो केंद्र सरकारला सादर करण्यात आला होता. त्याला लवकरात लवकर मंजुरी मिळावी, अशी मागणी  फडणवीस यांनी केली. यामुळे पर्यटन क्षेत्र, त्या क्षेत्रातील रोजगार आणि पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार आहे