डॉ. देवानंद शिंदे, राजीव जाधव, प्रताप दिघावकर यांची वर्णी

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) प्रदीर्घ काळापासून रिक्त  असलेल्या सदस्यपदी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे माजी कु लगुरू डॉ. देवानंद शिंदे, निवृत्त सनदी अधिकारी राजीव जाधव तसेच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रताप दिघावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आयोगाच्या कारभाराला गती मिळण्याची अपेक्षा के ली जात आहे.

लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही रोजगाराची संधी न मिळालेल्या स्वप्निल लोणकर या युवकाच्या आत्महत्येमुळे राज्य लोकसेवा आयोगाचा कारभार चव्हाट्यावर आला होता. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी लोकसेवा आयोगाच्या कारभाराचे वाभाडे काढताना, स्वायत्ता दिली म्हणजे स्वैराचाराने वागता येणार नाही. आयोगाच्या कारभारावर विद्यार्थी नाराज असून हा कारभार सुधारण्यासाठी आणखी किती लोणकरांचा बळी घेणार अशी विचारणा करीत आयोगाच्या कारभारावर टीका के ली होती. त्यावेळी आयोगाच्या कारभारात सुधारणा केल्या जातील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली होती. आयोगाची भरती प्रक्रि या गतिमान करण्याबरोबरच आयोगावरील रिक्त जागा ३१ जुलैपर्यंत भरण्याची घोषणा पवार यांनी के ली होती. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गेल्याच आठवड्यात झालेल्या बैठकीत लोकसेवा आयोगाच्या तीन सदस्यांची नावे निश्चित करून या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शुक्रवारी पाठविण्यात आली होती. सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्ता भरणे यांनीही बुधवारी राज्यपालांची भेट घेऊन सदस्य नियुक्तीस मान्यता देण्याची विनंती के ली होती. त्यानंतर काल रात्री उशिरा राज्यपालांनी या प्रस्तावास मान्यता दिली. त्यानुसार मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी तिन्ही सदस्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले असून वयाची ६२ वर्षे किं वा नियुक्तीपासून सहा वर्षे असा या सदस्यांचा कार्यकाल असेल. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांनी आपल्या पसंतीच्या प्रत्येकी एका सदस्याची नियुक्ती केल्याचे समजते.

Alibaug, Rahul Narvekar
अलिबागचे नामकरण करण्याची मागणी, विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात तक्रार दाखल
Vijay Wadettiwar
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी निवडणुकीपूर्वीच केली ‘चांगल्या खात्या’ची मागणी, जाणून घ्या कारण ?
Complaint against Fadnavis
फडणवीस व भाजप उमेदवार राम सातपुतेंविरुद्ध आचार संहिता भंग केल्याची तक्रार, मोची समाजाला प्रलोभन दाखविण्याचा आरोप
Chhagan Bhujbal willing to contest Nashik Lok Sabha seat
शिंदे गटाची पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे धाव; भुजबळांना उमेदवारीच्या चर्चेने अस्वस्थता

लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतीश गवई यांची मुदत या महिनाअखेर संपत आहे. नव्या अध्यक्षाच्या नावाबाबतही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाली आहे. आयोगाचे  सदस्य दयानंद मेश्राम नोव्हेंबरमध्ये निवृत्त होत आहेत. त्यानंतर आणखी एका सदस्याची नियुक्ती के ली जाईल.

जाधव अजितदादांचे माजी सचिव…

सदस्यपदी नियुक्त झालेले राजीव जाधव हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सचिव होते. त्यापूर्वी त्यांनी पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त म्हणूनही काम के ले होते. शिंदे हे शिवाजी विद्यापीठाचे कु लगुरू होते. मुंबई विद्यापीठाच्या कु लगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे काही काळ होता. दिघावकर हे पोलीस सेवेतून अलीकडेच निवृत्त झाले आहेत.