Mumbai Gold Stolen From Locker News : एका फायनान्स कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांनी त्यांच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आलेलं २१ कोटी रुपये किंमतीचं २९ किलो सोनं अनाधिकृतपणे गहाण ठेऊन त्याबदल्यात कर्ज घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शाखा व्यवस्थापकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. शिवकुमार अय्यर (३०), शिवाजी पाटील (२९), सराफा व्यापारी सचिन साळुंके (४१) अशी या तिघांची नावे आहेत. शिवकुमार अय्यर आणि शिवाजी पाटील फायनान्स कंपनीचे कर्मचारी असून त्यांनी हा पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याचं सांगितले जात आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, रोव्हर फायन्सस कंपनीच्या डोंबिवली शाखेत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आकाश पचलोड यांनी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. रोव्हर फायन्सस कंपनीने एप्रिल २०२४ मध्ये फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी ताब्यात घेतली होती. त्यानंतर त्यांनी कंपनीच्या कर्ज विभागाचे ऑडीट सुरू केले. मात्र, यावेळी त्यांना लॉकरमध्ये असलेलं २१ कोटी रुपये किंमतीचं २९ किलो सोने गहाळ झाल्याचं लक्षात आलं.

Cyber ​​theft robbed an IT expert in Vasai worth Rs 1.5 crore by digital arrest
सायबर भामट्यांनी केले ‘डिजिटल अरेस्ट’, वसईतील आयटी तज्ञाला दीड कोटींचा गंडा
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
R. G. Chandramogan hatsun agro products arun icecream owner net worth house and success story from selling icecreams to becoming a billionaire
एकेकाळी हातगाडीवर विकायचे आईस्क्रीम अन् आता आहेत अब्जावधींचे मालक; वाचा एकविशीत कंपनी सुरू करणाऱ्या आर. जी. चंद्रमोगन यांची यशोगाथा
Gyanradha Multistate, cheated, arrest,
तब्बल ३,५१५ कोटींनी फसवणूक करणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या प्रमुखांना अखेर ठोकल्या बेड्या
divorced woman commits suicide by jumping from building balcony in kalyan
कल्याणमध्ये घटस्फोटीत महिलेची इमारतीच्या गॅलरीमधून उडी मारून आत्महत्या
Built a multi-crore company through hard work and won three national awards
Success Story: दहावीच्या परीक्षेत नापास… नातेवाइकांनी केला अपमान; मेहनतीच्या जोरावर उभी केली करोडोंची कंपनी अन् पटकावले तीन राष्ट्रीय पुरस्कार
kolkata rape case
Kolkata Rape Case : पीडितेची ओळख उघड केल्याप्रकरणी विद्यार्थिनीला अटक; ममता बॅनर्जींविरोधातही आक्षेपार्ह टीप्पणी!
Mards Rakhi bandhu ya movement today
मुंबई : मार्ड’चे आज ‘राखी बांधू या’ आंदोलन

हेही वाचा – ‘टाटा कॅन्सर रुग्णालया’तील डॉक्टरांची निवृत्ती वय वाढविण्याची पंतप्रधानांकडे मागणी! एकाचवेळी आठ डॉक्टर होणार निवृत्त…

याप्रकरणी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाखा व्यवस्थापक शिवकुमार अय्यर (३०) आणि अन्य एक कर्मचारी शिवाजी पाटील (२९) यांना विचारपूस केली. सुरुवातीला त्यांनी याचं उत्तर देण्यास टाळाटाळ केली. मात्र, त्यानंतर त्यांनी हे सोनं गहाण ठेऊन कर्ज घेतल्याचं तसेच ही कर्जाची रक्कम सराफा व्यापारी सचिन साळुंके (४१) याच्या मार्फत शेअर बाजाराच गुंतवल्याचे त्यांनी कबूल केलं. तसेच त्यांनी शेअर बाजारात नुकसान झाल्याचीदेखील माहिती दिली.

विशेष म्हणजे यापूर्वी तक्रारदार आकाश पचलोड यांनी ४ जून रोजी आरोपींची भेट घेऊन गहाळ झालेल्या सोन्याबाबत विचारणा केली होती. पण यावेळी आरोपींनी आपले अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे सांगत त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा – मुंबईत हंगामातील ८६ टक्के पाऊस, गुरुवारीही मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज

दरम्यान, आकाश पचलोड यांच्या तक्रारीनंतर आता गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्रॉपर्टी सेलने तिघांना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४०८, ४०९, ५०६, ५०६ ब, ४२० आणि १२० ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास गुन्हे अन्वेषण शाखेद्वारे करण्यात येत आहे.