राम कदम यांच्याविरोधात गुन्हा

भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जावेद अख्तर यांच्याविरोधात घोषणाबाजी केली

मुंबई : जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागावी या मागणीसाठी आंदोलन करणारे भाजपचे आमदार राम कदम यांच्याविरोधात पार्कसाइट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राष्टीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल हे तालिबानी मानसिकतेचे आहेत, असे वक्तव्य कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी केले होते. त्यावरून भाजप नेते आक्रमक झाले. अख्तर यांनी माफी मागावी या मागणीसाठी राम कदम यांच्यासह भाजपाच्या सुमारे २० कार्यकर्त्यांनी घाटकोपर येथील आर सीटी मॉलच्या मागे आंदोलन केले. यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जावेद अख्तर यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. करोना नियमांचे उल्लंघन करून आंदोलन सुरू असल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना रोखले. दरम्यान, करोना नियमांचे उल्लंघन करणे आणि सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fir against bjp mla ram kadam zws