राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई पोलिसांनी फराज मलिक यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांच्यावर व्हिसा बनवण्यासाठी बनावट कागदपत्रे वापरल्याचा आरोप आहे. नवाब मलिक तुरुंगात असताना आता मलिकांच्या मुलावरही गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

फराज मलिक यांनी त्यांचा व्हिसा तयार करण्यासाठी जी कागदपत्रे पुरवली होती त्यातील काही कागदपत्रे बनावट असल्याचा आरोप आहे. यावरूनच मुंबई पोलिसांनी फराज मलिकांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणामुळे मलिक कुटुंबाच्या अडचणीत वाढ झालेली दिसत आहे.

Shobha Bachhav, BJP Dhule,
धुळ्यात भाजप, काँग्रेसमध्ये चुरशीची लढत ? शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
Ashok Chavan, kanhan, Nana Patole,
नाना पटोले हे शरद पवार, उद्धव ठाकरेंसमोर बोलू शकत नाही, अशोक चव्हाण यांची टीका; म्हणाले, “स्वप्नांवर पाणी टाकले…”
Heena Gavit nandurbar
नंदुरबार – धुळ्यात भाजप उमेदवारांच्या विरोधात राष्ट्रवादीची नाराजी
vijay shivtare
निनावी पत्राद्वारे शिवतारेंच्या माघारीवर टीका; पवारांच्या विरोधातील ५ लाख ८० हजार मतदारांनी करायचे काय?

या प्रकरणी भाजपा नेते मोहित कंबोज यांनीही ट्वीट करत गंभीर आरोप केले. मोहित कंबोज म्हणाले, “मुंबई पोलिसांनी नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिकविरोधात व्हिसासाठी बनावट कागदपत्रे वापरल्यावरून गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी फ्रेंच रहिवासी असलेल्या दुसऱ्या पत्नीच्या व्हिसा अर्जासाठी हे बनावट कागदपत्रे वापरली. इतरांच्या घोटाळ्यावर बोलणारे स्वतः किती घोटाळेबाज आहेत.”

आपल्या अन्य एका ट्वीटमध्ये मोहित कंबोज यांनी म्हटलं, “फराज मलिकने बनावट कागदपत्रे तयार करून एका फ्रेंच रहिवासी असलेल्या मुलीबरोबर लग्न केलं. त्यानंतर विवाह प्रमाणपत्रासह अनेक खोटी कागदपत्रे बनवली. तसेच त्या फ्रेंच महिलेला भारतीय नागरिकत्व देण्याचं काम केलं. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केली. मी त्याचं स्वागत करतो.”

“मागील सरकारच्या काळात दबाव असल्याने या प्रकरणात गुन्हा दाखल होत नव्हता. नवाब मलिक इतरांवर खोटी कागदपत्रे बनवल्याचा आरोप करतात आणि यांचा मुलगा काय करतो हे नवाब मलिकांना माहिती नाही का?” असा सवाल मोहित कंबोज यांनी केला.

हेही वाचा : Flashback 2022 : सरत्या वर्षात महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ, २०२२ मध्ये तुरुंगात गेलेल्या सहा बड्या नेत्यांचा आढावा…

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की, याची चौकशी करावी. तसेच सत्य बाहेर आणावं,” अशी मागणी मोहित कंबोज यांनी केली.