नवाब मलिकांविरोधात एफआयआर दाखल; क्रांती रेडकर यांची माहिती

क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात एफआयआर दाखल केल्याचे सांगितले

आर्यन खान प्रकरणात वादात सापडलेले अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे हे मुस्लीम आहेत की नाही यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. याचसंदर्भात समीर यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी आज एक अगदीच वेगळा दावा केला असू हा दावा सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय आहे. समीर यांच्या वडिलांबरोबरच त्यांच्या पत्नीने म्हणजे क्रांती रेडकर यांनी दाऊद नाव निकाह नाम्यावर कुठून आलं याबद्दलचं उत्तर एएनआयशी बोलताना दिलं आहे.

दरम्यान, समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात एफआयआर दाखल केल्याचे सांगितले आहे.”निकाहनामा बरोबर आहे. निकाह झाला पण समीरने कायदेशीररित्या धर्म, जात बदलली नाही. माझी सासू मुस्लिम असल्याने आणि त्यांच्या आनंदासाठी निकाह झाला ही केवळ औपचारिकता होती. नवाब मलिक यांनी शेअर केलेले जन्म प्रमाणपत्र चुकीचे आहे.” असे क्रांती रेडकर म्हणाल्या. 

“आमचे वैयक्तिक फोटो शेअर करून नवाब मलिक त्यांनी घेतलेल्या संवैधानिक शपथेविरुद्ध काम करत आहे. आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू, एफआयआर नोंदवण्यात आला आहे. समीर वानखेडे यांना पदावरून हटवण्याचा त्यांचा एकच हेतू आहे जेणेकरून त्यांच्या जावयाला वाचवता येईल.”, असा आरोप देखील क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांच्यावर केला आहे. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fir filed against nawab malik information of kranti redkar srk

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या