‘डीएसके’विरुद्ध मुंबईतही गुन्हा दाखल होणार!

आतापर्यंत साडेचार कोटींची फसवणूक?

Mumbai's Saki Naka , 24 yr old man allegedly beaten to death over suspicion of mobile theft , Crime , Police, Loksatta, Loksatta news, marathi, Marathi news
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

आतापर्यंत साडेचार कोटींची फसवणूक?

बांधकाम क्षेत्रात बडे प्रस्थ असलेल्या डीएसके समूहाविरुद्ध पुण्याच्या आर्थिक गुन्हे विभागाने गुन्हा दाखल केल्यानंतर आता मुंबई पोलिसांकडूनही स्वतंत्र गुन्हा दाखल केला जाण्याची दाट शक्यता आहे. मुंबईतील गुंतवणूकदारांनी याप्रकरणी आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार केल्यानंतर त्यात तथ्य आढळल्यामुळे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून कळते. मुंबई पोलिसांकडे आतापर्यंत साडेचार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. मात्र हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

या गुंतवणूकदारांमध्ये सेवानिवृत्त झालेल्या तसेच अनेक वयोवृद्ध नागरिकांचा समावेश आहे. डीएसके समूहाच्या दादर येथील कार्यालयात या गुंतवणूकदारांनी संपर्क साधला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. याप्रकरणी काही गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाचे उपायुक्त  पराग मणेरे यांच्याकडे तक्रार दिली होती. पुण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु मुंबई पोलिसांकडूनही तपास सुरू होता आणि प्राथमिक चौकशीनंतर त्यात तथ्य आढळल्यामुळे अखेर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले. डीएसके कुलकर्णी डेव्हलपर्स लि., डीएसके कन्स्ट्रक्शन, डीएसके असोसिएटस्, डी. एस. कुलकर्णी अ‍ॅण्ड सन्स, डी. एस. कुलकर्णी अ‍ॅण्ड ब्रदर्स, डीएसके इंटरप्राईझेस आदी कंपन्यांकडून फसवणूक झाल्याचे या तक्रारीत नमूद आहे.

तपासात तथ्य

डीएसके समूहाच्या मुंबईतील गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन आर्थिक गुन्हे विभागाकडे सप्टेंबरमध्ये तक्रार केली होती. या तक्रारीचा तपास सुरू होता. या तपासात तथ्य आढळल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली होती. याप्रकरणी एक-दोन दिवसांत गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे. आतापर्यंत मोजकेच गुंतवणूकदार पुढे आले आहेत. ही संख्या शेकडोंच्या घरात असल्याचे याप्रकरणी पुढाकार घेणाऱ्या एका गुंतवणूकदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fir register against dsk group