scorecardresearch

Premium

मुंबई : गिरगावमधील बहुमजली इमारतीला आग; इमारतीत अडकलेल्या २७ रहिवाशांची सुखरूप सुटका

अडकलेल्या २७ रहिवाशांना सुरक्षिततेचे उपाय म्हणून सुखरूप गच्चीवर नेले. परिणामी, या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

Fire at a multi storey building in girgaon 27 residents rescued safely from building
गिरगावमधील बहुमजली इमारतीला

दक्षिण मुंबईतील गिरगाव परिसरातील १४ मजली ‘गणेश कृपा’ इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील डक्टमध्ये शनिवारी दुपारी २.३० च्या सुमारास भीषण आग लागली होती. आगीमुळे दुर्घटनाग्रस्त इमारत आणि आसपासच्या परिसरात धुराचे लोट पसरले होते. आगीच्या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि जवानांनी इमारतीत अडकलेल्या २७ रहिवाशांना सुरक्षिततेचे उपाय म्हणून सुखरूप गच्चीवर नेले. परिणामी, या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

हेही वाचा >>> विक्रोळीत मिरवणुकीत सहभागी तरूणांनी केला महिला पोलिसांचा विनयभंग

uran potholes and dust on the road, uran people suffer due to potholes, dust due to potholes in uran
उरण : पावसाळा सरला आणि रस्त्यांवर धुरळा पसरला; प्रवाशांना खड्डे आणि धुरळा यांचा करावा लागतोय सामना
uran traffic jam, khopta bridge, heavy container trucks, trucks parked on khopta bridge, high risk of accidents
उरण : अवजड कंटनेर वाहनांनी खोपटा पूल मार्ग रोखला, दोन्ही बाजूने वाहने उभी केल्याने अपघाताचा धोका
pune heavy rain, rainwater accumulated on the roads in pune, pune street lights off due to rain
पावसाळापूर्व कामे केल्याचा महापालिकेचा दावा फोल; पुण्यातील रस्ते जलमय
Traffic police Nagpur
नागपूर : खासगी टोईंग व्हॅनमुळे वाहतूक पोलीस सुस्त! कमाईचा मोठा स्रोत गेल्याने नाराजी, वाहनावरील मजुरांची रस्त्यावरच ‘दादागिरी’

गिरगावमधील सिक्का नगर परिसरातील डॉ. देशमुख लेनमधील चौदा मजली ‘गणेश कृपा’ इमारतीला आग लागल्यामुळे परिसरात गोंधळ उडाला होता. घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील डक्टमध्ये लागलेली आग क्षणातच पहिल्या मजल्यावरील इलेक्ट्रिक डक्टपर्यंत पसरली. दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच रहिवासी दुर्घटनाग्रस्त इमारतीतून बाहेर पडले. मात्र दुर्घटनाग्रस्त इमारतीत  १७ महिला, ५ पुरुष आणि ५ लहान मुले असे एकूण २७ रहिवासी अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून या रहिवाशांना सुखरुपपणे इमारतीच्या गच्चीवर नेले. आग इमारतीत पसरू नये यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी विद्युतपुरवठा खंडित केला. त्यानंतर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fire at a multi storey building in girgaon 27 residents rescued safely from building mumbai print news zws

First published on: 30-09-2023 at 19:02 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×