मुंबई : वडाळा पूर्व येथील संगमनगर परिसरातील बेस्टच्या विद्युत उपकेंद्राला सोमवारी रात्री आग लागली. रात्री साडेनऊच्या सुमारास ही आग लागली. या आगीमध्ये आजूबाजूच्या झोपड्या जळल्याचे समजते. रात्री उशीरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. वडाळा येथील विद्यालंकार कॉलेजच्या मागील बाजूस असलेल्या झोपडपट्टीजवळ बेस्टचे विद्युत उपकेंद्र आहे. या उपकेंद्राला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे समजते. या आगीमुळे आजूबाजूच्या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरा आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.