चेंबूरमध्ये चाळीतील एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत होरपळून पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामध्ये दोन चिमुकल्यांचादेखील समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ नगर परिसरात चाळीतील एका घराला आज पहाटे साडेपाचच्या सुमारास आग लागली. घराच्या मीटर बॉक्समध्ये शॉकसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितलं जात आहे. या घरात गुप्ता कुटुंबिय राहत असल्याची माहिती आहे. ते पहाटे झोपेत असताच ही घटना घडली. या आगीत गुप्ता कुटुबांतील पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन चिमुकल्यांचाही समावेश आहे. प्रेम गुप्ता (३०), अनिता गुप्ता (३०), मंजू गुप्ता (३०), परीस गुप्त (७) आणि नरेंद्र गुप्ता (१०) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

massive fire broke out in a warehouse in a residential building in nalasopara
नालासोपाऱ्यात निवासी इमारतीत असलेल्या गोदामाला भीषण आग
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
man hit his father on head with an iron rod after arguments in amravati
अमरावती : रागातून उद्भवला वाद; मुलाने लोखंडी बत्त्याने वडिलांच्या डोक्यावर…
massive fire at mandai metro station
मंडईतील मेट्रो स्थानकात भीषण आग, वेल्डिंग करताना ठिणगी पडल्याने फोमला आग
in pune fire audit of libraries requested municipal corporation doesnt take action protest was also warned
अभ्यासिकांचे फायर ऑडिट करा, अन्यथा… युवा सेनेचा महापालिकेला इशारा
santoshi mata mandir chembur
मुंबई: चेंबूरमधील मंदिरात भीषण आग
navi peth pune fire
पुणे: नवी पेठेतील अभ्यासिकेत आग
Loksatta chavdi
चावडी: उद्घाटन मध्यरात्री २ वाजता!

हेही वाचा – मुंबई : आचारसंहितेपूर्वी महापालिकेच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी कार्यक्रमांचा धडाका

हेही वाचा – मालमत्ता कर थकवणाऱ्या अंधेरीतील विकासकाच्या तीन गाड्यांचा लिलाव

याशिवाय या घरात इतरही काही सदस्य होते, तेदेखील या आगीत जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांना आगीवरन नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती आहे.