नवी मुंबईतील पवने एमआयडीसीमध्ये मोठी आग लागली आहे. पवने एमआयडीसीमधील केमिकल कारखान्याला ही आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

अद्याप तरी या आगीचे कारण समजू शकलेले नाही. आतापर्यंत या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या ही आग विझवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू आहेत.

सविस्तर वृत्त लवकरच