मुंबई: मुंबई सेंट्रल येथील आग्रीपाडा पोलीस स्थानकानजिक असलेल्या एकवीस मजली इमारतीला सोमवारी सकाळी आठच्या सुमारास अचानक आग लागली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही.

सोमवारी सकाळी इमारतीला आग लागताच धुराचे लोट इमारतीत पसरू लागले. ही बाब लक्षात येताच रहिवाशांनी आरडाओरडा सुरू केला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. विजेच्या तारा आगीच्या संपर्कात आल्यामुळे आगीचा भडका उडाला. त्यामुळे इमारतीतील विद्युत यंत्रणा, विद्युत तारा आगीत जळून खाक झाल्या.

अग्निशामकांनी इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना शिड्यांच्या साहाय्याने सुरक्षित स्थळी हलविले. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून सकाळी दहाच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविले.

Story img Loader