मुंबईतल्या मुलुंड भागात असलेल्या अपेक्स हॉस्पिटलला आग लागली होती. जनरेटर जास्त प्रमाणात तापला आणि त्याला आग लागली. ज्यामुळे ही आग इतर भागातही पसरली. या रुग्णालयात चाळीस रुग्ण उपचार घेत होते. त्यांना इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा एक बंब या ठिकाणी दाखल झाला. तसेच खासगी रुग्ण वाहिकेच्या मदतीने रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्यात आले आहे. यामधले ३ रुग्ण व्हेंटिलेटरवर होते अशीही माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

अ‍ॅपेक्स हॉस्पिटल तीन अँब्युलन्स आल्या होत्या याद्वारे ४० रुग्णांना विविध रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं आहे. आज रात्री मुंबईत १२ तासांचा बॅक अप ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.