प्रभादेवी परिसरातील इमारतीला लागलेली आग आटोक्यात!

बचाव कार्यासाठी अग्रीशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल.

संग्रहित छायाचित्र

मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरजवळील ज्ञानरूप इमारतीच्या दुसऱ्या मजल्याला आग लागल्याची दुर्घटना रविवारी घडली.  घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या पाच गाड्या आणि चार पाण्याचे टॅंकर घटना स्थळी दाखल झाल्या होत्या. आगीवर नियंत्रण मिळविण्याच्या शर्तीच्या प्रयत्नांना रात्री उशीरा यश आले असून  इमारतीची आग आटोक्यात आली आहे. या दुर्घटनेतील आर्थिक आणि जीवित हानीचे कोणतेही वृत्त मिळू शकलेले नाही.

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fire bulding near prabhadevi area in mumbai