Lalbaug Fire: ‘बिल्डरने कोट्यवधींची फसवणूक केली…’, आयुक्तांसमोर रहिवाशांनी व्यक्त केला संताप

लालबाग परिसरामधील वन अविघ्न पार्क या आलिशान इमारतीला आज दुपारी १२ च्या सुमारास भीषण आग लागली.

one avighna park fire
लालबागमध्ये आहे ही आलिशान इमारत

लालबाग परिसरामधील वन अविघ्न पार्क या आलिशान इमारतीला आज दुपारी १२ च्या सुमारास भीषण आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशामन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. ही आग लेव्हल चारची असल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त इकबाल चहल घटनास्थळी पोहोचले आहेत. यावेळी या इमारतीतल्या रहिवाशांनी आपली व्यथा मांडली आहे.

आयुक्त चहल घटनास्थळी पोहोचताच इथल्या रहिवाशांनी त्यांना घेराव घातला. चहल यांच्याकडे संताप व्यक्त करत त्यांनी आपली व्यथाही चहल यांनी बोलून दाखवली. रेफ्युजी एरियामध्ये पाण्याची सुविधा ठेवली नाही इतका निष्काळजीपणा केला आहे. इतकी आग लागल्यानंतरही पाण्याची सुविधा नाही. फायर सिस्टिम फेल गेली आहे. २०२० ला सोसायटी तयार झाली. बिल्डर घरे ताब्यात देत नाहीये, असे आरोप रहिवाशांनी केले आहेत.

हेही वाचा – लालबागमध्ये इमारतीला भीषण आग, महापौर किशोरी पेडणेकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “समयसूचकता दाखवली असती तर…”

वन अविघ्न पार्क ही इमारत भारत माता चित्रपटगृहासमोर आहे. लालबागमधील सर्वात उंच इमारतींपैकी एक असणारी ही इमारत ६० मजल्यांची असून १९ व्या मजल्यावर आग लागली आहे. आग लागल्यानंतर काहींनी खाली उड्या मारल्याची दृष्यही समोर आल्याचं एबीपीने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. एक व्यक्ती गॅलरीला लटकून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच खाली पडल्याचंही दिसून आलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fire in mumbai lalbaug one avighna building customers complaining to iqbal chahal vsk

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही