मुंबईतल्या सात मजली इमारतीला आग लागली आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान पोहचले असून आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरु आहे. पीटीआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. या इमारतीतून धूर येऊ लागल्याने या इमारतीत आग लागल्याची माहिती समोर आली. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी आले. काही लोक अडकले होते त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे.

मुंबईतील मस्जिद बंदर भागात असलेल्या इमारतीला आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली. आता ही आग नियंत्रणात आणण्यात आली आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही असंही अग्निशमन दलाने स्पष्ट केलं आहे. आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अवघ्या २६ मिनिटांमध्ये त्यांनी आग नियंत्रणा आणली. ही आग कशी लागली हे समजू शकलेले नाही. मात्र आता ही आग पूर्णपणे नियंत्रणात आणली गेली आहे.