व्हिडीओः परळ भागातील इमारतीला आग

मुंबईच्या परळ भागातील नमन हाईटस या इमारतीला आज(शनिवारी) आग लागल्याची घटना घडली. रेल्वेच्या विद्युत पुरवठा केंद्रापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या इमारतीला आग लागल्याने अधिक मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता होती.

मुंबईच्या परळ भागातील ‘नमन मिडटाऊन’ या इमारतीला आज(शनिवारी) आग लागल्याची घटना लागली. या इमारतीच्या १५व्या मजल्यावर आग लागली असून, इमारतीच्या आतमध्ये अजूनपर्यंत २० जण अडकल्याची माहिती मिळत आहे. आग लागल्यानंतर घटनास्थळी अग्निशामन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत या आगीत कोणी जखमी झाले की नाही याबद्दल निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. रेल्वेच्या विद्युत पुरवठा केंद्रापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या इमारतीला आग लागल्याने अधिक मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र, अग्निशमन दलाने वेळीच उपाययोजना केल्याने हा धोका टळला. अग्निशमन दलाने  सुरक्षेचा उपाय म्हणून संपूर्ण इमारतीचा वीजपुरवठा खंडित केला.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fire taken place in lower parels naman heights

ताज्या बातम्या