मुंबई हादरली! कांदिवलीत दुचाकीवरुन आलेल्यांचा अंदाधुंद गोळीबार, एकाचा मृत्यू | Firing in Kandivali area of Mumbai cause one death sgy 87 | Loksatta

Firing in Mumbai: मुंबई हादरली! कांदिवलीत दुचाकीवरुन आलेल्यांचा अंदाधुंद गोळीबार, एकाचा मृत्यू

देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई गोळीबाराने हादरली आहे

Firing in Mumbai: मुंबई हादरली! कांदिवलीत दुचाकीवरुन आलेल्यांचा अंदाधुंद गोळीबार, एकाचा मृत्यू
मुंबई गोळीबाराने हादरली आहे

Firing in Mumbai: देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई गोळीबाराने हादरली आहे. कांदिवलीत रात्रीच्या सुमारास झालेल्या या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून, तिघे जखमी आहेत. अंतर्गत वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्री १२ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी हा गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी काय सांगितलं आहे?

“कांदिवलीत रात्री १२ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास आम्हाला दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी काही लोकांवर गोळीबार केल्याची माहिती आम्हाला मिळाली. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून, तिघे जखमी आहेत. याप्रकरणी तपास सुरु आहे,” अशी माहिती झोन ११ चे डीसीपी विशाल ठाकूर यांनी दिली आहे.

जुन्या वादातून गोळीबार झाल्याचा संशय

जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. गोळीबारात ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्याचं नाव अंकित यादव असल्याची माहिती मिळत आहे. गोळीबार करणारे आणि पीडित एकमेकांना ओळखत होते असंही सांगण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी एकूण चार गोळ्या झाडल्या.

आरोपी फरार

डीसीपी विशाल ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दुचाकीवरुन आले होते. गोळीबार केल्यानंतर ते घटनास्थळावरुन फरार झाले आहेत. दरम्यान जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना गुरुमंत्र, म्हणाले, “अजितदादा जसे १०-१२ कारखाने चालवतात…”

संबंधित बातम्या

‘तो’ कबुतराचं मांस चिकन म्हणून हॉटेल्सला विकायचा; मुंबईमधील धक्कादायक प्रकार, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई: शिवरायांच्या जन्मस्थळाबाबत भाजप आमदाराचे अज्ञान; विरोधी पक्ष आक्रमक झाल्याने दिलगिरी
परदेशी कलाकारांविरुद्ध गुन्हा दाखल; परवान्याशिवाय भारतात काम केल्याचा आरोप
मुंबईत ३ ते १७ डिसेंबर दरम्यान जमावबंदीचे आदेश? सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, “कलम १४४ चे निर्देश…”
खारमध्ये डिलिव्हरी बॉयकडून घरात घुसून महिलेचा विनयभंग, पीडिता म्हणाली, “त्याने माझे…”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबई: शिवरायांच्या जन्मस्थळाबाबत भाजप आमदाराचे अज्ञान; विरोधी पक्ष आक्रमक झाल्याने दिलगिरी
मुंबई: राज्य औषध व्यवसाय परिषदेला राजकीय कुरघोडीची बाधा
दुर्धर व्याधीग्रस्त रुग्णांसाठी जिल्हास्तरावर विशेष उपचार केंद्र; रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न
मुंबई: गोवरची विशेष लसमात्रा आवश्यकच ;बालरोगतज्ज्ञांचे स्पष्टीकरण
मुंबई अग्निशमन दलात लवकरच भरती