मुंबई : कुर्ला येथील कपाडिया नगर भागात सोमवारी संध्याकाळी अज्ञात व्यक्तींनी मुंबई महानगरपालिकेच्या एका कंत्राटदारावर गोळीबार केला. महानगरपालिकेच्या ‘एल’ विभाग कार्यालयातून घरी जात असताना कंत्राटदारावर गोळीबार करण्यात आला. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, विशेष पथके सज्ज करून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री ८ च्या सुमारास घडली. दहिसर येथे वास्तव्यास असलेला कंत्राटदार सुरज प्रताप सिंह देवरा यांच्यावर सोमवारी रात्री दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. मात्र, सुदैवाने सुरज सिंह यांना गोळी लागली नाही. सुरज यांच्या दिशेने झाडलेली गोळी त्यांच्या मोटरगाडीला लागली. त्यानंतर सुरज सिंह तेथून आपल्या मोटरगाडीमधून निघून गेले. वाकोला पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली, असे पोलिसांनी सांगितले.

flamingo, Solar lights, Navi Mumbai ,
फ्लेमिंगो क्षेत्रात सौरदिवे! पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर नवी मुंबई महापालिकेची धावाधाव
North East Mumbai Lok Sabha Constituency Citizens Health Issue
आमचा प्रश्न – ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ : नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न टांगणीला
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी
property tax, metro contractors
मेट्रोच्या कंत्राटदारांनी थकवला ३७५ कोटी रुपये मालमत्ता कर, मुंबई महानगरपालिकेची थकबाकीदारांना नोटीस

हेही वाचा – पुणे : अंगारकी चतुर्थी निमित्त दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, पहाटेपासूनच रांग

हा हल्ला निविदा मिळविण्यासाठी किंवा इतर काही कारणाने झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी भादंवि कलम ३०७, ३४, भारतीय हत्यार बंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना पकडण्यासाठी कक्ष ५ मधील विशेष अधिकाऱ्यांची काही पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच, मुंबई गुन्हे शाखादेखील तपास करीत आहे. तसेच, आरोपींना पकडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रणाची तपासणी करण्यात येत आहे.