मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) एमयूटीपी प्रकल्पातील मेट्रो सारखी पहिली लोकल पश्चिम रेल्वेला मिळणार आहे. मेट्रो सारखी पहिली लोकल मिळावी, अशी मागणी रेल्वे बोर्डाकडे करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्र यांनी दिली. या लोकल अधिक आरामदायी आणि आकर्षक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>मुंबई: अनामत रक्कमेसह सर्वात आधी येणाऱयास थेट घर

एमआरव्हीसीच्या एमयूटीपी ३ मधील ४७ आणि एमयूटीपी – ३ अ मधील १९१ वातानुकूलित लोकल येत्या काही वर्षात मध्य आणि पश्चिम रेल्वेवर दाखल होणाक आहेत. येणाऱ्या २३८ वातानुकूलित लोकलची रचना वेगळी आहे. नव्या वातानुकूलित लोकल मेट्रो पद्धतीच्या असतील. या लोकलचे डबे, अंतर्गत रचना, रंगसंगती मेट्रो डब्यांसारखी आकर्षक आहेत. यातील आसनव्यवस्था मेट्रो गाड्यांप्रमाणे नसेल. त्याची रचना मात्र सामान्य लोकलसारखी असणार आहे. तसेच यात प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणी असे प्रकार नसतील. सध्या धावत असलेल्या वातानुकूलित लोकलमध्ये दिव्यांग आणि मालवाहतूक करणाऱ्या प्रवाशांसाठी स्वतंत्र डबा नसल्याने त्यांच्या प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे स्वतंत्र व्यवस्था असावी, अशी मागणी वारंवार होत होती. या मागणीनुसार त्यांच्यासाठीही स्वतंत्र व्यवस्था असणार आहे.

हेही वाचा >>>पोटनिवडणुकीसाठी आघाडीत एकीचे प्रयत्न; कसबा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा

सध्या पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकला प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे एमयूटीपी ३ आणि ३ अ मधील एकूण २३८ वातानुकूलित लोकलपैकी पश्चिम रेल्वेला सुरुवातीला ४० लोकल मिळाव्यात, तसेच मेट्रो प्रकारातील डबे असलेली ही वातानुकूलित लोकल प्रथम पश्चिम रेल्वेलाच मिळावी, अशी मागणीही रेल्वे बोर्डाकडे करण्यात आल्याची माहिती महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्र यांनी दिली. सध्या पश्चिम रेल्वेवर दररोज १५ हजार तिकिटांची, तर सरासरी ५०० पेक्षा अधिक पासची खरेदी प्रवासी करीत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First metro local on western railway mumbai print news amy
First published on: 03-02-2023 at 15:31 IST