पाच विकासक पुनर्विकासासाठी उत्सुक

गोरेगाव येथील मोतीलाल नगर पुनर्विकासासाठी बांधकाम क्षेत्रातील पाच नामांकित खासगी विकासकांनी आणि कंपन्यांनी उत्सुकता दर्शविली आहे.

मोतीलाल नगर पुनर्विकासाला प्रतिसाद

मुंबई : गोरेगाव येथील मोतीलाल नगर पुनर्विकासासाठी बांधकाम क्षेत्रातील पाच नामांकित खासगी विकासकांनी आणि कंपन्यांनी उत्सुकता दर्शविली आहे. निविदापूर्व बैठक सोमवारी पार पडली असून प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला.

उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार १४२ एकर जागेवर वसलेल्या मोतीलाल नगर म्हाडा वसाहतीचा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या पुनर्विकास प्रकल्पात ३७०० रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार असून त्यांना १६०० चौ. फुटांची घरे देण्यात येणार आहेत, तर पुनर्विकासासाठी पुरेसा निधी नसल्याचे सांगून मंडळाने खासगी विकासकाची नियुक्ती करून पुनर्विकास मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ऑक्टोबरमध्ये बांधकामासाठी निविदा मागविण्यात आल्या. निविदापूर्व बैठकीला चांगला प्रतिसाद मिळाला. पाच जणांनी या प्रकल्पासाठी उत्सुकता दाखविली. म्हाडातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाचही कंपन्या बांधकाम क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या आहेत. मुंबईतील मोठय़ा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग असलेल्या, पुनर्विकासाचा अनुभव असलेल्या अशा या कंपन्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. आता या कंपन्यांपैकी किती जण प्रत्यक्षात निविदा सादर करतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. या निविदा १४ डिसेंबरला खुल्या होणार असून या वेळी प्रत्यक्ष किती निविदा सादर झाल्या हे समजणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Five developers redevelopment ysh