मरिन ड्राईव्ह येथील पोलिस जिमखान्याजवळ भरधाव ऑडी मोटारीने गुरुवारी रात्री चार पोलिसांसह एकूण पाच जणांना चिरडले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलिस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ऑडीचा चालक दिनेश खांडेकर यांना अटक केलीये. खांडेकर यांनी गाडी चालवताना मद्यप्राशन केले होते का, हे शोधण्यासाठी त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. ऑडी मोटार मरिन लाईन्सहून कुलाब्याच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी नाकाबंदीसाठी उभ्या असलेल्या पोलिसांना या गाडीने चिरडले.

Canada vs India: कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरी NIA ची धाड; जप्तीची कारवाई!

“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”

वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर

Video: “जस्टिन ट्रुडोंनी फार मोठी चूक केलीये”, अमेरिकेतील अभ्यासकांनी सांगितलं कारण; म्हणे, “हे म्हणजे मुंगीनं…”!