मुंबई : सौदीया समूहाची वेगाने विस्तारणारी कमी खर्चाची विमान कंपनी फ्लायडीलने मुंबई-रियाधदरम्यान थेट विमान सेवा सुरू केली आहे. या कंपनीची विमान सेवा सुरू झालेले हैदराबाद पाठोपाठ भारतातील मुंबई दुसरे शहर आहे. या मार्गावर अत्याधुनिक एअरबस ए ३२० निओ विमानांचा वापर केला जात आहे. भविष्यात लखनौ, दिल्ली, कोलकाता व चैन्नईला सौदी अरेबियाशी जोडले जाईल.
फ्लायडील ही सौदी अरेबियाची कमी खर्चातील (लो-कॉस्ट) विमान कंपनीआहे. फ्लाय डील कंपनीने भारतात आपली विमान सेवा विस्तारण्यास सुरुवात केली आहे. फ्लाय कंपनीने चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कॅप्टन अब्दुल अझीझ बाहरी व चीफ पायलट कॅप्टन अली हकीम यांनी या विमानाचे उड्डाण करविले.
मुंबई-रियाध विमान सेवेमुळे दरमहा ७,४०० हून अधिक नवीन आसनांची भर पडली आहे. या विमान सेवेमुळे भारत व सौदी अरेबियादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक पर्याय व सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. नव्या विमानांची वेळ प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत सोयीस्कर ठेवण्यात आली आहे. या विमानसेवेमुळे सौदी अरेबियातील आभा, दम्माम, जेद्दाह व मदिना यासारख्या लोकप्रिय शहरांसाठी एकाच नोंदणीवर थ्रू-फेअरसह बॅगेज थेट गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवता येईल.
या विमानात १८६ आसने उपलब्ध आहेत. एअरबसचे प्रसिद्ध एअरस्पेस केबिन इंटिरिअर, सामानासाठी अधिक जागा असलेले एक्स्ट्रा-लार्ज ओव्हरहेड बिन्स व आरामदायी प्रवासासह उत्साहवर्धक वातावरण निर्माण करणारे केबिन डिझाइन व लाइटिंगची सुविधा आहे. सध्या फ्लायडिलच्या ताफ्यात ४७ विमाने आहे. २०३० पर्यत कंपनी विमानांचा ताफा १०० करणार आहे.
भारत जगातील सर्वात मोठी व वेगाने वाढणारी विमान वाहतूक बाजारपेठ आहे. सौदी अरेबिया आता भारतातील आघाडीच्या तीन सर्वांत मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रवास बाजारपेठांपैकी एक असून प्रवास व पर्यटकांची ये-जा सातत्याने वाढत असल्याने प्रवाशांना फ्लायडीलची सोयीस्कर, परवडणारी विमान सेवा उपलब्ध आहे. -संजीव कपूर, ॲक्टिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी, फ्लायडिल
