व्यावसायिक गॅसच्या दरात १०० रुपयांनी वाढ

मुंबई : व्यावसायिक गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत असून यामुळे उपाहारगृहांमधील खाद्यपदार्थ महागण्याची चिन्हे आहेत. गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅसच्या दरात २६६ रुपयांनी वाढ झाली. आता पुन्हा  गॅस १०० रुपयांनी महागला आहे. वर्षभरात जवळपास ८६६ रुपयांची दरवाढ झाल्याने खाद्यपदार्थाचे दर वाढण्याची तयारी उपाहारगृह व्यावसायिकांनी केली आहे.

The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर
Panvel water
‘पिण्यासाठी पाणी द्या, मग पाणी बचतीचा संदेश द्या’
Loksatta lokshivar Low Cost Drumstick Farming farmer
किफायतशीर शेवगा!

डिझेल, पेट्रोल आणि त्यापाठोपाठ स्वयंपाकाच्या गॅसचे दर उसळी घेत असल्याने उपाहारगृह व्यावसायिक चिंतेत आहेत. वर्षअखेरच्या डिसेंबर महिन्यात चोखंदळ खवय्ये मोठय़ा प्रमाणात उपाहागृहांमध्ये जातात. डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात ख्रिसमसपासून ३१ डिसेंबपर्यंत उपहारगृहांना विशेष मागणी असते. त्यातच गॅसचे दर वाढल्याने आर्थिक गणित जुळवायचे कसे, अशी विवंचना व्यावसायिकांपुढे आहे.

नोव्हेंबर २०२० मध्ये १,१८९ रुपयांना मिळणारा सिलेंडर आज २०५१ रुपयांवर पोहोचला आहे. शिवाय विविध कर याचा भार असतोच. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक अशी अवस्था झाली आहे. केंद्र सरकारला विनंती करूनही गॅसच्या दरात कपात झालेली नाही. त्यामुळे व्यवसाय टिकविण्यासाठी पदार्थाच्या किमती वाढवणे हाच पर्याय आमच्यापुढे आहे, असे उपाहारगृह मालकांचे म्हणणे आहे. पदार्थाचे दर वाढवले तरी व्यवसायावर नकारात्मक परिणाम होणार आहे. मध्यमवर्गाने उपाहारगृहांकडे पाठ फिरवली तर व्यवसायाचे दिवाळे वाजेल, अशी भीतीही व्यवसायिकांनी व्यक्त केली.

दर दिवशी छोटेखानी उपाहारगृहांना दोन, तर मोठय़ा उपाहारगृहांना चार ते पाच गॅस सिलेंडरची गरज भासते. म्हणजे या दरवाढीने एका उपाहारगृहाचा दिवसाला दोन ते चार हजारांनी खर्च वाढणार आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने वाहतुकीचाही खर्च वाढत आहे. याचा परिणाम म्हणून पदार्थाचे दर वाढवले तर ग्राहक दुरावण्याची भीती आहे. त्यामुळे आता ही दरवाढ रोखावी, अशी विनंती राज्य आणि केंद्र सरकारला करण्यात येईल.

– शिवानंद शेट्टी, अध्यक्ष, आहार

व्यावसायिक गॅसवरील १८ टक्क्यांचा वस्तू व सेवा कर ५ टक्के करून ही दरवाढ रोखता येऊ शकते. त्या संदर्भात आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रदेखील पाठवले आहे. पण त्याचा विचार झालेला नाही. गॅस दरवाढ ही उपाहारगृह व्यवसायाला तोटय़ाच्या दरीत लोटणारी आहे. सरकारने या दरवाढीचा फेरविचार करायला हवा. काही दिवसात पदार्थाचे दर वाढतील. त्याचा भार सामान्यांच्या खिशावर येईल.

प्रदीप शेट्टी, वरिष्ठ उपाध्यक्ष, हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया.