पश्चिम व मध्य रेल्वे समितीकडून तपासणी अहवाल सादर; सूचनांचा भडिमार

एल्फिन्स्टन स्थानकातील पादचारी पुलावर झालेल्या अपघातानंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील पादचारी पुलांची तपासणी (ऑडिट) करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पश्चिम व मध्य रेल्वेकडून १२२ स्थानकांची तपासणी करण्यासाठी १३ समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांच्याकडून ३ ऑक्टोबरपासून तपासणी करतानाच सात दिवसांत अहवाल सादर करण्यात येणार होता. त्यानुसार ९ ऑक्टोबर रोजी समितीकडून पश्चिम व मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे अहवाल सादर करण्यात आला आहे. नवीन पादचारी पूल, पुलांची रुंदी वाढवा, अतिक्रमण हटवण्याची सूचना या अहवालातून करण्यात आली आहे. सर्व समित्यांकडून सादर झालेल्या अहवालातील माहिती एकत्र करून ती दोन ते तीन दिवसांत दोन्ही रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे सादर केली जाणार आहेत.

mumbai, registered vehicle number, RTO, traffic jam, vehicular pollution
मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
nashik, Manmad, Severe Water Shortage, Wagdardi Dam, Near Depleting, water storage,
वागदर्डीतील मृतसाठाही संपुष्टात येण्याच्या मार्गावर; मनमाडकरांची पाणी टंचाई तीव्र होण्याची चिन्हे
slums in Dharavi
धारावीतील बहुमजली झोपड्यांसाठी विकास नियंत्रण नियमावलीत विशेष तरतूद?

एल्फिन्स्टन स्थानकातील पादचारी पुलाच्या अरुंद पायऱ्यांवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत २३ प्रवाशांना प्राण गमवावे लागले. यानंतर तात्काळ रेल्वेकडून रेल्वेमंत्र्यांच्या आदेशानुसार सर्व स्थानक तसेच या स्थानकांतील पादचारी पुलांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अभियांत्रिकी, वाणिज्य विभाग, रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस, पालिकेचे अधिकारी यांची नियुक्ती तपासणी करण्यासाठी करण्यात आली. त्यासाठी पश्चिम रेल्वेकडून पाच, तर मध्य रेल्वेकडून आठ समित्या नेमण्यात आल्या. ३ ऑक्टोबरपासून मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांची तपासणी करताना पादचारी पूल, त्यावरून उतरताना आणि चढताना प्रवाशांना होणारी गैरसोय, स्थानकातील प्रवेशद्वार आणि पुलांच्या पायऱ्यांजवळ असणारे अतिक्रमण इत्यादींची पाहणी करण्यात आली.

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरील काही स्थानकांच्या प्रवेशद्वार आणि पादचारी पुलाच्या पायऱ्यांजवळ अतिक्रमणे झाली असून ती हटविण्यात यावीत, पादचारी पुलांची रुंदी वाढवा, पादचारी पूल हे स्वच्छ ठेवण्यात यावेत, नवीन पादचारी पूल बांधावे, सीसीटीव्ही कॅमेरे, पूल हे स्कायवॉकलाही जोडावेत, पादचारी पूल हे

एकमेकांना जोडण्यात यावेत, आणखी काही स्थानकांजवळ रुळांच्या बाजूला संरक्षक भिंतही बांधण्याची गरज असल्याची सूचना करतानाच रेल्वे सुरक्षा दलही पुलांवर तैनात करावेत, असेही नमूद करण्यात आले आहे.

अहवालातील महत्त्वाचे मुद्दे

  • एल्फिन्स्टन रोड स्थानकातील तिकीट आरक्षण केंद्र अन्यत्र नेणे. त्यामुळे पुलाचे रुंदीकरण शक्य
  • परेल स्थानकातील पादचारी पुलाच्या प्रवेशद्वाराजवळच अतिक्रमण असून ती हटवण्याची सूचना केली आहे, तर प्लॅटफॉर्मवर उतरताना असणाऱ्या पायऱ्यांची रुंदी वाढवण्यास सांगण्यात आले आहे. परळ टर्मिनस लवकरात लवकर मार्गी लावा
  • दादर स्थानकात काही पादचारी पुलांची रुंदी वाढवणे गरजेचे, तर पूर्व व पश्चिम असा स्कायवॉक जोडावा.
  • चिंचपोकळी स्थानकात भायखळा दिशेने असणाऱ्या पुलालाच लागून अतिक्रमण हटवण्यात यावे. स्थानकाच्या मधल्या दिशेला नवीन पादचारी पुलांची गरज.
  • सीएसएमटी स्थानकाच्या कल्याण दिशेला असणाऱ्या (मस्जीद स्थानक दिशेने) रुळांजवळ अतिक्रमण असून ते हटवण्यात यावे. स्थानकातील पादचारी पुलांमध्येही प्रवाशांच्या दृष्टीने काही बदल करावा.
  • कुर्ला स्थानकातील पादचारी पुलांची रुंदी वाढवणे. त्याचप्रमाणे या स्थानकातील सीसीटीव्हींचा दर्जा निकृष्ट आहे. या स्थानकात आणखी ४० कॅमेऱ्यांची गरज.
  • वडाळा रेल्वे स्थानकात आणखी चार प्रवेशद्वारे उपलब्ध करणे आवश्यक. २६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज
  • पनवेल स्थानकात प्लॅटफॉर्म नंबर एककडून असणारे अनधिकृत प्रवेशद्वार बंद करण्यात यावे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज.
  • ठाणे स्थानकात पूर्वेस सॅटिस बांधण्याची ठाणे पालिकेची सूचना. सॅटिसकडे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे.
  • भांडुप स्थानकात दोन नवीन पादचारी पूल बांधणे. कल्याण दिशेकडील काही अनधिकृत बांधकामे तोडणे.
  • मुलुंड पश्चिमेकडील रेल्वे आणि पालिकेच्या हद्दीतील तिन्ही प्रवेशद्वारांकडील दुकाने स्थलांतरित करणे. आणखी एका पादचारी पुलाची गरज.
  • भांडुप स्थानकात दोन नवीन पादचारी पूल बांधणे.

आमच्याकडून नियुक्त करण्यात आलेल्या समितीकडून तपासणी अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यांच्याकडून सादर करण्यात आलेली प्रत्येक स्थानकाची माहिती एकत्र करून ती रेल्वे महाव्यवस्थापकांना सादर केली जाईल. समितीकडून सूचना करतानाच रेल्वे सुरक्षा दल, स्टेशन मास्तर, खासदार, आमदार, प्रवासी संघटनांनीही सूचना केल्या आहेत. ही सर्व माहिती एकत्र करून साधारण शुक्रवापर्यंत महाव्यवस्थापकांना सादर केली जाईल. नवीन पादचारी पूल, पुलांची रुंदी वाढवणे यासह बऱ्याच सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र त्यावर आता बोलणे योग्य होणार नाही.

मुकुल जैन, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पश्चिम रेल्वे