नव्या संवत्सराची आशादायी सुरुवात

निफ्टी निर्देशांकानेही सत्राला सुरुवात १४४ अंशांच्या मोठ्या मुसंडीसह केली.

Share Market Live Updates Stock market sensex 62000 nifty 18600
(Express photo by Ganesh Shirsekar)

मुंबई : भांडवली बाजारासाठी अनेकांगाने संस्मरणीय आणि गुंतवणूकदारांसाठी भरभराटीच्या राहिलेल्या वर्षात, दिवाळीतील लक्ष्मीपूजनानंतर गुरुवारी झालेले मुहूर्ताचे व्यवहार हे आगामी संवत्सर २०७८ साठी आशादायी मनोरथ रचणारे ठरले. मुख्य निर्देशांक ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ने या तासाभराच्या व्यवहारात अर्धा टक्क्यांहून अधिक कमाईसह सकारात्मक सुरुवात केली. सत्रारंभीच ‘सेन्सेक्स’मध्ये ३५९ अंशाच्या दमदार वाढीसह ६०,१३१ पातळीवरून झाली. निफ्टी निर्देशांकानेही सत्राला सुरुवात १४४ अंशांच्या मोठ्या मुसंडीसह केली. सायंकाळी ७.१५ वाजता या विशेष व्यवहारांच्या सत्रअखेरीस सेन्सेक्स २९५.७ अंशांनी वधारून ६०,०६७.६२ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ८७.६ अंशांची वाढ झाली आणि तो १७,९१६.८० पातळीवर स्थिरावला.  

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: For the capital market for investors prosperity behavior indices sensex and nifty akp

ताज्या बातम्या