सोन्याच्या तस्करीप्रकरणी परदेशी महिलेला अटक; मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची कारवाई

जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत सुमारे पावणे दोन कोटी रुपये असल्याचे सूत्रांनी सांगितले.

foreign woman arrested in gold smuggling case
तस्करीप्रकरणी परदेशी महिलेला अटक प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई :सीमाशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत साडे तीन किलो सोन्याच्या दागिन्यांची तस्करी केल्याप्रकरणी परदेशी महिलेला शनिवारी अटक केली. तिच्याकडून जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत सुमारे पावणे दोन कोटी रुपये असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा >>> सांताक्रुझ हत्येप्रकरणी आरोपीला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

साहरा मोहम्मद ओमर (४०) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून ती युनायटेड किंगडमच्या(युके) पारपत्रावर भारतात आली होती. ती मूळची केनिया देशातील नागरिक आहे. ती केनियातील नायरोबी येथून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर शनिवारी आली होती. तिच्याबाबत सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आल्यामुळे तिला थांबवून तपासणी केली असता अंर्तवस्त्रमध्ये सोने लवपले असल्याचे निष्पन्न झाले. तपासणीत तिच्याकडे सोन्याच्या १७ लगड सापडल्या. त्यांचे वजन ३४६५ ग्रॅंम असून किंमत एक कोटी ६४ लाख रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. सर्व सोने जप्त करण्यात आले असून महिलेविरोधात सीमा शुल्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली.

हेही वाचा >>> मुंबई: गस्तीवरील पोलिसाचा मृत्यू

जप्त करण्यात आलेले सोन्याच लगड २२ कॅरेटचे आहेत. २१ कॅरेट सोन्याचे दागिने तिने परिधान केले होते. सर्व सोने पंचनामा करून ते सोने ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी महिलेने प्रथमच सोन्याची तस्करी केल्याचे प्राथमिक चौकशीत सांगितले. याबाबत सीमाशुल्क विभाग अधिक तपास करत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Foreign woman arrested in gold smuggling case at mumbai airport mumbai print news zws

First published on: 01-10-2023 at 22:47 IST
Next Story
मुंबई: सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात; महानगर गॅस लिमिटेड कंपनीचा निर्णय