मुंबई: सुमारे चार कोटी कोटी रुपयांच्या कोकेनची तस्करी केल्याप्रकरणी सीमाशुल्क विभागाने परदेशी महिलेला अटक केली. महिला तिच्या पाकिटात कोकेन लवपून आणत होती. मुंबईत एका व्यक्तीला तिला कोकेन द्यायचे होते. पण त्यापूर्वी विमानतळावर तिला सीमाशुल्क विभागाने अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी पश्चिम आफ्रिकन देश सिएरा लिओन येथील नागरिक असलेल्या बिंटू जनेह याला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडवले. तिच्या पाकिटाची तपासणी केल्यानंतर ५०० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले, असे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याची किंमत ३ कोटी ८० हजार रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

पैशांची गरज असल्यामुळे आपण कोकेनची तस्करी करण्यास होकार दिला होता, असे चौकशी दरम्यान महिलेने सांगितले. अमली पदार्थ दिल्यानंतर तिला मुख्य आरोपींकडून काही रक्कम मिळणार होती. तिला अदिस अबाबा येथे कोकेन देण्यात आले. मात्र, ते कोणाला द्यायचे याबाबतची कोणतीही माहिती तिला नाही. याप्रकरणी आरोपी महिलेला अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली असून न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.

दोन कोटींचे सोने जप्त, पाच प्रवाशांना अटक सीमाशुल्क विभागाने बुधवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाच प्रवाशांकडून सुमारे दोन कोटी रुपये किमतीचे साडे चार किलो सोने जप्त केले आहे. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १७ ऑगस्टला तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तीन प्रवाशांना शौचालयात व आसनाच्या मागे लपवून सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते. इतर दोन प्रकरणांमध्ये दोन प्रवाशांनी कपड्यांमध्ये सोने लपवून त्याची तस्करी केली. ते दुबईहू मुंबईत आले होते. या विविध प्रकरणांमध्ये एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आल्याचे सीमाशुल्क अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Foreign woman arrested with cocaine worth 4 crores at mumbai airport mumbai print news zws
First published on: 19-08-2022 at 19:25 IST