बछडय़ाच्या संरक्षणासाठी वनविभागाचे कर्मचारी तैनात

विहार तलावाजवळ बिबटय़ाच्या पिल्लाचे दर्शन

विहार तलावाजवळ बिबटय़ाच्या पिल्लाचे दर्शन

मुंबई : आरे परिसरातील विहार तलावाजवळील ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंग’च्या  (एनआयटीआयई) आवारात बुधवारी बिबटय़ाच्या बछडय़ाचे दर्शन घडले. मादी बिबटय़ा आणि तिच्या एक-दीड महिन्याच्या बछडय़ाच्या संरक्षणासाठी सध्या तेथे वनविभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

आरे परिसरातील विहार तलावापासून साधारण ५०० मीटरच्या अंतरावर एनआयटीआयई आणि आयआयटी या संस्था आहेत. या भागात कायम बिबटय़ाचा वावर असतो; मात्र बिबटय़ाच्या पिल्लाचे अस्तित्व येथे प्रथमच जाणवले आहे. सध्या संचारबंदी असल्याने या परिसरातील मानवी वावर कमी झाला आहे. तरीही, बिबटय़ा आणि तिच्या बछडय़ाच्या संरक्षणाच्या दृष्टीने त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे मांजर आपल्या पिल्लांना एका ठिकाणी न ठेवता संरक्षणाच्या दृष्टीने त्यांना घेऊन अनेक ठिकाणी स्थलांतर करते त्याप्रमाणेच मादी बिबटय़ाही आपल्या बछडय़ांना घेऊन अनेक ठिकाणी स्थलांतर करते.

सध्यातरी एकच बछडा दिसून आला असून त्याचे वय एक ते दीड महिना आहे. त्यांच्या जीवनशैलीत क ोणत्याही प्रकारे जाणीवपूर्वक व्यत्यय आणला जाणार नाही. मादी बिबटय़ा स्वत:हून बछडय़ांना घेऊन स्थलांतर करण्याची वाट पाहिली जात आहे, तोपर्यंत त्यांच्या संरक्षणासाठी वनविभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती मुंबई वनविभागाचे वनक्षेत्रपाल संतोष कं क यांनी दिली. ज्या ठिकाणी बछडा दिसला त्याच ठिकाणी त्याचा जन्म झाला असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये असली तरीही, कं क यांनी दिलेल्या माहितीनुसार बछडय़ाचा जन्म अन्य ठिकाणी झाला आहे. त्यानंतर मादी बिबटय़ाने त्याला तेथे आणले आहे.

आरे जंगलाच्या संरक्षणाचा मुद्दा

‘आरे वाचवा चळवळी’तील कार्यकर्ते तबरेझ सय्यद यांनी यानिमित्ताने आरे जंगलाच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित के ला. आरे परिसरात सतत लागणाऱ्या आगींमुळे तेथील वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला आहे. त्यामुळे जंगलाचा मुख्य भाग सोडून कधीही जेथे बछडय़ांचा वावर नसतो अशा ठिकाणी मादी बिबटय़ा आपल्या बछडय़ाला घेऊन आली. त्यामुळे आरेतील आगींबाबत गांभीर्याने विचार होण्याची गरज त्यांनी व्यक्त के ली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Forest department personnel deployed for protection of leopard calf zws