वरळीतील शिवसेनेचे माजी नगरसेवक ऍड. संतोष खरात यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातील शिवसेनेच्या नगरसेवकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा >>>मुंबई: प्रतिगामी विचार सरणीच्या भूमिका साकारणार नाही; चिन्मय मांडलेकर
शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबई महानगरपालिकेतील किती माजी नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जातात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. वरळी हा शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांचा बालेकिल्ला आहे. तसेच आमदार आदित्य ठाकरे यांचा हा मतदारसंघ आहे. याच मतदारसंघातील ऍड संतोष खरात यांनी सोमवारी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला.काही दिवसांपूर्वी विक्रोळी पार्कसाईट येथील शिवसेनेच्या माजी नगरसेविका डॉ. भारती बावदाने यांनी आपल्या पतीसह शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेवकांची संख्या सहा झाली आहे.