सत्यपाल मलिक यांच्या दाव्याने खळबळ

आपल्या राज्यपालपदाच्या कार्यकाळात, ‘अंबानी’ आणि ‘रा.स्व. संघाशी संबंधित व्यक्ती’ यांच्याशी संबंधित दोन फायली ‘क्लिअर’ केल्यास तुम्हाला ३०० कोटी रुपये मिळतील, असे आपल्याला सांगण्यात आले होते.

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या एका दाव्याने खळबळ उडाली आहे. मला जम्मू-काश्मीरमधील तत्कालीन पीडीपी-भाजप युती सरकारमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एक मंत्री आणि अंबानी यांच्याशी संबंधित दोन फायलींवर स्वाक्षरी करण्यासाठी ३०० कोटींची लाच देऊ केली होती, परंतु आपण त्या आमिषाला बळी पडलो नाही, असा दावा मलिक यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे. 

आपल्या राज्यपालपदाच्या कार्यकाळात, ‘अंबानी’ आणि ‘रा.स्व. संघाशी संबंधित व्यक्ती’ यांच्याशी संबंधित दोन फायली ‘क्लिअर’ केल्यास तुम्हाला ३०० कोटी रुपये मिळतील, असे आपल्याला सांगण्यात आले होते. मात्र, आपण हा व्यवहार रद्द केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याबाबत माहिती दिली, असा दावा मलिक यांनी केला आहे. भ्रष्टाचाराबाबत तडजोड करण्याची गरज नाही, असे सांगून मोदी यांनी आपल्या निर्णयाला पाठिंबा दिल्याबद्दल मलिक यांनी पंतप्रधानांची प्रशंसा केली.काश्मीरला गेल्यावर दोन फायली हातावेगळ्या करण्यासाठी माझ्याकडे आल्या होत्या. त्यापैकी एक अंबानींशी संबंधित, तर दुसरी पूर्वीच्या पीडीपी-भाजप युतीच्या मेहबूबा मुफ्ती सरकारमध्ये मंत्री असलेल्या आणि पंतप्रधानांच्या अगदी जवळ असल्याचा दावा करणाऱ्या संघाशी संबंधित एका व्यक्तीची होती. या व्यवहारांमध्ये घोटाळा असल्याचे या दोन्ही मंत्रालयांच्या सचिवांनी मला सांगितले. त्यामुळे मी दोन्ही व्यवहार रद्द केले. ‘या प्रत्येक फायलीसाठी तुम्हाला १५० कोटी रुपये मिळतील,’ असे हे सचिव मला म्हणाले; पण ‘मी पाच कुर्ते-पायजम्यांसह आलो आहे आणि तसाच येथून जाईन,’ असे मलिक यांनी राजस्थानमधील झुनझुनु येथे एका मेळाव्यात बोलताना सांगितले. त्यांच्या या भाषणाची ही चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे.मलिक मेघालयचे राज्यपाल आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Former governor of jammu and kashmir satyapal malik akp

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या