मुंबई : आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या दोन्ही मुलांविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या आरोपपत्राची विशेष न्यायालयाने शुक्रवारी दखल घेतली. दुसरीकडे देशमुख यांनी आता नियमित जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर ४ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी आरोपपत्राची दखल घेत देशमुखांसह अन्य आरोपींविरोधात प्रक्रिया सुरू केली. देशमुख आणि त्यांच्या दोन्ही मुलांविरोधात ईडीने सात हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. त्याआधी ईडीने १४ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. परंतु विशेष न्यायालयाने आरोपपत्राची दखल घेतलेली नसल्याचा दावा करत देशमुख यांनी जामिनाची मागणी केली होती. मात्र ईडीने कायद्याने निश्चित केलेल्या वेळेत आरोपपत्र दाखल केले असल्याचे स्पष्ट करत देशमुख यांना जामीन नाकारला होता.

Sameer Wankhede, Narcotics case,
अमली पदार्थ प्रकरण : समीर वानखेडेविरोधातील प्राथमिक चौकशीचे पुरावे सादर करा, उच्च न्यायालयाचे एनसीबीला आदेश
nagpur, rape victim girl missing, police started search operation, rape victim girl in nagpur, crime in nagpur, crime news, nagpur news, marathi news,
न्यायालयात गोंधळ घालणारी युवती अचानक बेपत्ता
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली
Rashmi Barve
रश्मी बर्वे प्रकरणावर बुधवारी सुनावणी, जातवैधता प्रमाणपत्रामुळे निवडणूक अर्ज रद्द