scorecardresearch

पनवेलच्या माजी महापौरला चुनाभट्टीत अटक

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी पनवेलमधील माजी महापौर जगदीश गायकवाड यांना सोमवारी अटक केली.

पनवेलच्या माजी महापौरला चुनाभट्टीत अटक
प्रातिनिधिक फोटो- लोकसत्ता

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी पनवेलमधील माजी महापौर जगदीश गायकवाड यांना सोमवारी अटक केली. जगदीश गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते.

पनवेल नगरपालिकेतील माजी महापौर जगदीश गायकवाड यांनी  काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. गायकवाड सोमवारी चुनाभट्टी परिसरात होते. त्यावेळी वंचितच्या कार्यकर्त्याने त्यांना रस्त्यात गाठले. यावेळी दोघांमध्ये बचाबाची झाली. त्यानंतर गायकवाड यांनी या कार्यकर्त्याला मारहाण केली. कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून चुनाभट्टी पोलिसांनी गायकवाड यांना अटक केली. गायकवाड यांनी यावेळी आपल्याला बंदुक दाखवून धमकावल्याचा आरोप या कार्यकर्त्याने केला असून याबाबत तपास करण्यात येत असल्याचे चुनाभट्टी पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-01-2023 at 16:11 IST

संबंधित बातम्या