सातबारा उताऱ्यावरील नोंदीसाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झालेला पनवेलचा नायब तहसीलदार सुहास खामकर व त्याचा साथीदार गणेश भोगाडे याला अलिबाग सत्र न्यायालयाने प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे. पनवेल तालुक्यातील कदम यांनी आपल्या जमिनीची विक्री केल्यानंतर खरेदीदाराचे नाव जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर नोंद करण्यासाठी पनवेल तहसील कार्यालयात अर्ज केला होता. मात्र त्यासाठी नायब तहसीलदार सुहास खामकर याने त्यांच्याकडे लाच मागितली होती.

“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट

एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…

कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’

संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल